NCP Morcha Satara
NCP Morcha Satara sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : राष्ट्रवादीचा विराट मोर्चा; तर लाठी घेवून दालनात घुसू : शशिकांत शिंदेंचा इशारा

Umesh Bambare-Patil

NCP Lathi Morcha News : हल्ला बोल सरकारवर हल्ला बोल..., एकच वादा अजित दादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, शशिकांत शिंदे साहेबांचा विजय असो, अशी घोषणाबाजी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमदार शशिकांत शिंदेंच्या Shashikant Shinde नेतृत्वाखाली आज जिल्हा प्रशासन व राज्य सरकारच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर लाठी मोर्चा काढला. सातारा जिल्ह्याला एक संस्कृती व नावलौकिक आहे. या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी चांगले काम केले आहे. मात्र, आताचे अधिकारी मिंदे सरकारच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत. या मोर्चाने जर ते सुधारले नाही तर हीच लाठी घेवून दालनात घुसू, असा इशारा आमदार शिंदेंनी प्रशासनाला दिला.

बॉम्बे चौकात सकाळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमा झाले. त्यांनी हाता पक्षाचे झेंडे, बॅनर घेऊन जिल्हा प्रशासन व शिंदे सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यास सुरवात केली. त्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चास सुरवात झाली. हल्ला बोल हल्ला बोल या सरकारवर हल्ला बोल, एकच वादा अजित दादा..., राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, शशिकांत शिंदे साहेबांचा विजय असो, या सरकारचे करायचे काय खाली मुंडी वर पाय, शिंदे सरकार हाय हाय, अशा घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाला.

जिल्हा बॅंकेजवळआमदार शिंदे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर मोर्चा पुढे मार्गस्थ झाला आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. त्यानंतर आमदार शिंदे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटच्या कठडय़ावर चढले. त्यांच्यसोबत रमेश उबाळे, तेजस शिंदे व इतर कार्यकर्ते होते. ते म्हणाले, सरकारच्या विरोधात मोर्चा काढायला सुद्धा धाडस लागतं, ते फक्त राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे.

हे सरकार कुटनितीने सत्तेवर आले असून हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. या जिल्ह्याला एक संस्कृती असून जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी चांगले काम केले आहे. मात्र, आताचे अधिकारी मिंदे सरकारच्या ताटाखालचे मांजर बनले आहेत. या मोर्चाने जर सुधारले नाही तर हिच लाठी घेवून दालनात घुसू. ते म्हणाले, संत तुकाराम महाराज म्हणतात नाठाळाच्या माथी हाणू काठी. त्यामुळे हे सरकार हे प्रशासन जर सर्वसामान्यावर अन्याय करत असेल तर जनता खपवून घेणार नाही.

डीपी नाही, ट्रान्स्फॉर्मर नाही, सुविधा नाहीत आणि वीज कनेक्शन तोडायला कर्मचारी येतात. आधी सुविधा द्या, मग वीज तोडायला या. आता वीज तोडायला आला तर ही लाठी आहे, असा इशारा त्यांनी दिला. कर्जमाफी महाविकास आघाडी सरकारने केली. अजूनही काही शेतकरी या मिंदे सरकारने वंचित ठेवले आहेत. खोके सरकारने तिजोरीवर दरोडा टाकून आमदारांना ते गुवाहाटी येथे वाटले आहेत. तेच जर शेतकऱ्यांना वाटले असते तर मायबाप शेतकऱयांचे कल्याण झाले असते, असा टोला आमदार शशिकांत शिंदेंनी लगावला.

आम्ही तुम्हाला संपविणार....

कोण म्हणत राष्ट्रवादी संपत आली. अरे तुम्हाला संपवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसत नाही, असे ठणकावून शशिकांत शिंदे म्हणाले, हा आता मशाल पेटवली आहे. अंगार फुलला आहे. आम्ही सरळ आहे तोपर्यंत सरळ तुम्ही वाकडय़ात गेला की आम्ही पण वाकडय़ात जातो, अशा शब्दात त्यांनी विद्यमान सत्ताधाऱ्यांना फटकारले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT