Satara : सुडबुद्धीने वागणाऱ्या अधिकाऱ्यांचा पोलखोल करणार : शशिकांत शिंदे संतापले

Medical College मेडिकल कॉलेजच्या भंगार चोरीबाबत एक महिन्यात कारवाईचे आश्वासन देऊनही अद्याप कोणी गुन्हा दाखल करायचा यातच सर्व अडकून पडले आहे.
MLC Shashikant Shinde
MLC Shashikant Shindesarkarnama

Shashikant Shindes News : शिंदे, फडणवीस सरकार Shinde, Fadanvis Government सत्तेत आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासकिय अधिकारी निपक्षपणे काम करण्याऐवजी पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे सुडबुद्धीने वागत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली ही मंडळी काम करत असून या विरोधात आवाज उठवण्यासाठी येत्या गुरुवारी (ता. २३) राष्ट्रवादी काँग्रेसचा NCP जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध लाठी मोर्चा काढण्यात येणार असून यावेळी अधिकाऱ्यांचाा पुराव्यांसह पोलखोल करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांनी आज येथे दिला.

राष्ट्रवादी भवनात झालेल्या या पत्रकार परिषदेस जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, गोरखनाथ नलवडे, तेजस शिंदे, अतुल शिंदेंसह युवकचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार शिंदे म्हणाले, सातारा जिल्ह्यात राजकारण विरहित वातावरण होते, मात्र, सत्ता बदलानंतर सहा, सात महिन्यात विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह इतर सर्व अधिकारी एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता असल्यासारखे वागत आहेत.

ते कोणाच्या दबावाखाली काम करतात हे पुराव्यासह उघडकीय आणणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गुरुवारी (ता. २३) सकाळी दहा वाजता बॉम्बे चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा लाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. मेडिकल कॉलेजच्या भंगार चोरीबाबत एक महिन्यात कारवाईचे आश्वासन देऊनही अद्याप कोणी गुन्हा दाखल करायचा यातच सर्व अडकून पडले आहे.

MLC Shashikant Shinde
Koregaon : सांगलीला पाणी दिल्याचे पुरावे द्या... शशिकांत शिंदेंचे महेश शिंदेंना आव्हान

भंगार चोरणाऱ्यांशी या अधिकाऱ्यांशी साटेलोटे आहे. शासकिय अधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करतात, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन आहे. शेतकऱ्यांची कर्ज माफीचा दुसरा हप्ता मिळालेला नाही. शेतकऱ्यांची वीज तोडणे केली जात आहे. विज वितरणकडे डीपींची कमतरता आहे. नोकरभरतीकडे दूर्लक्ष झालेले आहे.

MLC Shashikant Shinde
Koregaon : कोरेगावच्या लोकप्रतिनिधींचे खोक्याला प्राधान्य...शशिकांत शिंदे

या सर्व बाबींवर आवाज उठविला जाणार आहे. एकुणच प्रशासकीय अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या हातातील कटपूतली झाले आहेत. सुडबुद्धीने अधिकारी पूर्णपणे एकतर्फी वागत आहेत. हा जिल्ह्याचा मोर्चा असून कोरेगावमधून वाईट प्रवृत्ती हटविण्यासाठी आगामी काळात लढणार असल्याचे आमदार शिंदेंनी सांगितले.

MLC Shashikant Shinde
Koregaon : शशिकांत शिंदेंनी कोरेगाव, खटावला पाण्यासाठी उपेक्षित ठेवले; दहा वर्षे केवळ नारळ फोडले... महेश शिंदे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com