NCP Pimpri Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP Politics : ब्लॅकमेलर, दीड शहाणा, मढ्यावरचं लोणी खाणारा; हफ्तेवसुली अन् बरंच काही...

Ajit Pawar : पिंपरीमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपांवरून जुंपली

Uttam Kute

Pimpri Chinchwad Political News :

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांकडे जाताच या दोन्ही गटांत जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. त्यातून उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार सकाळी सहा वाजता ठेकेदारांना घेऊन कामाला लागतात, असा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष तुषार कामठे यांनी केला होता. त्यावरून लगेचच अजितदादांनी कामठेंचे नाव न घेता त्यांचा दीड शहाणा असा उल्लेख करत त्यांचा बापच काढला. NCP Politics

तुषार कामठे आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यानंतर त्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्येही हा वाद रंगला आहे. ब्लॅकमेलर म्हणून त्यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. हे दोन्ही पदाधिकारी हे त्यांच्या पक्षाच्या झोपडपट्टी सेलचे शहराध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) झोपडपट्टी विभागाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संतोष निसर्गंध यांनी कामठेंचा प्रथम ब्लॅकमेलर म्हणून उद्धार केला.

कामठेंनी कोविड काळात मढ्याचे टाळूवरचे लोणी खाल्ल्याचा आरोप त्यांनी पत्रक काढून केला. ज्यांनी राजकारणात आणले ते चिंचवडचे भाजप आमदार दिवंगत लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्यावर आणि ज्या पक्षाने त्यांना नगरसेवक म्हणून संधी दिली, त्या भाजपवरही त्यांनी आरोप केले, याकडे निसर्गंधांनी लक्ष वेधले. महापालिका ठेकेदारांना पिंपळे निलख परिसरात बोलावून कोण ब्लॅकमेल करत होते, हेदेखील पुराव्यासह जाहीर करणार आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, निसर्गंध हेच ब्लॅकमेलर असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे झोपडपट्टी सेलचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष गणेश काळे यांनी केला. निसर्गंध यांचे आरोप बोगस असल्याचे सांगत उलट कोरोना काळातील भ्रष्टाचार कामठेंनीच बाहेर काढल्याचा दावा त्यांनी केला. निसर्गंध हे दोन नंबरवाल्यांकडून हफ्ते वसूल करत असून, त्याचे पुरावे देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या आरोप-प्रत्यारोपांमुळे राष्ट्रवादी पक्षातील दोन्ही गटांकडून भविष्यात आणखी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी होतील, वाद होतील, याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

(Edited by Avinash Chandane)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT