jayant patil devendra fadnavis.jpg sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil : पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचा बडा नेता 'तुतारी' हाती घेणार? जयंत पाटलांशी बंद दाराआड चर्चा

Akshay Sabale

सागर आव्हाड | पुणे :

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. पश्चिम महाराष्ट्राचा गड पुन्हा काबीज करून भाजपला हादरा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवारसाहेबांनी फासे टाकण्यास सुरूवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे अनेक नेते शरद पवारसाहेबांच्या संपर्कात आहेत. यात साताऱ्यातील मोठ्या नेत्याची भर पडली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी भाजपचे नेते, मदन भोसले यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर जयंत पाटील भोसले यांच्या घरातून हसतहसत बाहेर पडले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

वाई विधानसभा मतदारसंघातून मकरंद आबा पाटील ( Makrand Patil ) हे आमदार आहेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आमदार पाटील यांनी अजितदादांना साथ दिली होती. त्यामुळे आमदार पाटलांविरोधात तुल्यबळ अशा उमेदवाराचा शोध राष्ट्रवादीकडून ( शरदचंद्र पवार ) घेतला जात होता.

jayant patil meet madan bhosale

यातच जयंत पाटील यांनी वाईमधील भाजपचे माजी आमदार मदन भोसले यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे. या भेटीत जयंत पाटील आणि मदन भोसले यांच्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मदन भोसले यांनी 'तुतारी' हाती घेतल्यास भाजपला मोठा धक्का बसू शकतो. तसेच, अजितदादांचे आमदार मकरंद आबा पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे.

या भेटीनंतर जयंत पाटील हसत-हसत मदन भोसले यांच्या निवासस्थानाबाहेर पडले. तेव्हा, "भाजपमध्ये माझे सगळे मित्र आहेत," अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

मदन भोसले यांच्या पुतण्यानं घेतली पवारसाहेबांची भेट

एकीकडे जयंत पाटील यांनी मदन भोसले यांची भेट घेतली आहे. दुसरीकडे त्यांचे पुतणे यशराज भोसले यांनी शरद पवारसाहेबांची भेट घेतली. यशराज भोसले यांनी मकरंद आबा पाटील यांच्याविरुद्ध निवडणूक लढविण्याची इच्छा शरद पवारसाहेबांकडे व्यक्त केली आहे. लवकरच यशराज भोसले राष्ट्रवादीत ( शरदचंद्र पवार ) प्रवेश करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT