Prashant Paricharak : प्रशांत परिचारकांचे वाढले टेन्शन; कट्टर समर्थक माजी नगराध्यक्षाने घेतली जयंत पाटलांची भेट

Nagesh Bhosale meet Jayant Patil : या भेटीत नागेश भोसले यांनी पंढरपूरच्या माजी नगराध्यक्ष तथा भोसले यांच्या पत्नी साधना भोसले यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मागितली आहे. पंढरपूर-मंगळेवढा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी त्या इच्छूक आहेत.
Nagesh Bhosale Meet jayant Patil-Prashant Paricharak
Nagesh Bhosale Meet jayant Patil-Prashant ParicharakSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 24 August : भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे कट्टर समर्थक आणि पंढरपूरचे माजी उपनराध्यक्ष नागेश भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेत विधानसभा उमेदवारीची मागणी केली आहे. कट्टर समर्थकाने विधानसभेसाठी दावा केल्याने परिचारक गटाचे टेन्शन वाढणार आहे.

एकीकडे खुद्द प्रशांत परिचारक यांनीच विधानसभेची तयारी चालवली असताना भोसले यांच्या या खेळीने परिचारकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष, मर्चंट बॅंकेचे माजी अध्यक्ष नागेश भोसले (Nagesh Bhosale) यांनी जयंत पाटील (Jayant Patil ) यांची भेट घेतली आहे. या भेटीत नागेश भोसले यांनी पंढरपूरच्या माजी नगराध्यक्ष तथा भोसले यांच्या पत्नी साधना भोसले यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मागितली आहे. पंढरपूर-मंगळेवढा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी त्या इच्छूक आहेत.

नागेश भोसले यांनी शिष्टमंडळासह जयंत पाटील यांची भेट घेऊन थेट पंढरपूर-मंगळवेढ्यातून विधानसभेसाठी दंड थोपटल्याने प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांची अडचण वाढविणारे ठरणार आहे. या भेटीमुळे पंढरपूरच्या राजकारणात खळबळ उडाली असून पंढरपूरच्या राजकारणाची गणिते बिघडविणारी ठरणार आहे.

Nagesh Bhosale Meet jayant Patil-Prashant Paricharak
Raj Thackeray On Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत राज ठाकरेंचे मोठे विधान; ‘कदाचित दुसऱ्या महिन्याचा हप्ता मिळेल; पण...’

नागेश भोसले हे पंढरपूर शहरात ताकद राखून असलेले नेते आहेत. स्वतः भोसले हे पंढरपूर नगर परिषदेचे उपनराध्यक्ष राहिले आहेत. तसेच त्यांच्या पत्नी साधना भोसले यांनीही नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे, त्यामुळे भोसले यांनी केलेले बंड परिचारक यांच्यासाठी अडचणीचे ठरू शकते. आता परिचारक हे भोसले यांची कशी समजूत काढतात, हे पाहावे लागणार आहे.

भारतीय जनता पक्षात असलेले माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी विधानसभेची आगामी निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी केलेली आहे. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास ते अपक्ष निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

Nagesh Bhosale Meet jayant Patil-Prashant Paricharak
Anil Sawant : आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या पुतण्याने घेतली शरद पवारांची भेट

एकीकडे विधानसभेला गोळाबेरीज करत असताना पंढरपूर शहरातील कट्टर समर्थकानेच विधानसभेसाठी शड्डू ठोकल्याने प्रशांत परिचारक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com