Sharad Pawar poster sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP Sharad Pawar : सुजल्यावर कळतंय शरद पवारसाहेबांनी मारलंय कुठं? भाजप आणि अजितदादांना कुणी डिवचलं?

Roshan More

NCP Sharad Pawar : शरद पवारांचे राजकारण भल्याभल्यांना बुचकाळ्यात टाकते. 2019 शिवसेनेला सोबत घेत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करणे असो नाहीतर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गटाच्या 10 पैकी 8 खासदारांचा विजय असो. शरद पवारांनी लोकसभेत मिळवलेल्या यशाचे एका वाक्यात वर्णन करत भाजपसह अजित पवार गटाला डिवचणारे 'सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठं' असे बॅनर कोल्हापुरात लावण्यात आले आहेत.

कोल्हापुरातील दाभोळकर परिसरात हे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरवर 'सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठं' अशी एक ओळ, शरद पवारांचा फोटो आणि त्या शेजारी पक्षाचे चिन्हा 'तुतारी' फुंकणारा माणूस येवढेच आहे. आणि छोट्या अक्षरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार, कोल्हापूर जिल्हा असे लिहिलेले आहे.

कोल्हापुरात महायुतीने निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. अजित पवार Ajit Pawar गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी ताकद लावली होती. मात्र, काँग्रेसने शाहू छत्रपती यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवत सारी गणितेच फिरवली.

शरद पवार यांचे राजकीय डाव शेवटपर्यंत कोणालाच कळले नाहीत. म्हणून विरोधकांना त्यांनी सहज 'कात्रजचा घाट' दाखवला असे कोल्हापुरातील शरद पवारांचे समर्थक सांगत आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सर्वात कमी म्हणजे 10 जागा लढवत पवारांनी आठ जागा जिंकल्या. पवारांच्या प्रचाराचा काँग्रेसला देखील फायदा झाला. उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीसोबत ठेवण्यात देखील पवारांना यश मिळाले. या सगळ्यात महाविकास आघाडीने महायुतीवर सहज मात करत विजय मिळवल्याचे देखील शरद पवार यांचे समर्थक म्हणत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT