Pimpri-Chinchwad : आतापर्यंत राज्यात न मिळालेलं मंत्रीपद पिंपरी-चिंचवडला यंदा थेट केंद्रात मिळण्याची संधी!

Shrirang Barne : उद्योगनगरीचा मंत्रीपदाचा बॅकलॉग भरून निघण्याची शक्यता, श्रीरंग बारणे यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची चिन्हं!
Shrirang Barne
Shrirang BarneSarkarnama

Shivsena In Modi Government : लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली.मात्र, केंद्रात पुन्हा `एनडीए`चेच सरकार येऊ घातले आहे. त्यात शिवसेनाही असून त्यांना दोन मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. त्यातून पिंपरी-चिंचवडचा मंत्रीपदाचा बॅकलॉग भरून निघण्याची संधी आय़तीच चालून आली आहे. या शहराला आतापर्यंत या पदाने अनेकदा नुसती हुलकावणीच दिलेली आहे.

केंद्रात मंत्रीपदासाठी मावळचे पिंपरी-चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे यांचे नाव घेतले जात आहे. त्यांनी खासदारकीची यावेळी हॅटट्रिक केली आहे.शिंदे शिवसेनेचे सात खासदार निवडून आले आहेत. त्यांचा टेकू हा एनडीए सरकारच्या दृष्टीने खूप मोलाचा आहे.

Shrirang Barne
Maval Election result 2024 : चिंचवडवर जगताप कुटूंबाचा होल्ड कायम, बारणेंना दिले सर्वाधिक पाऊण लाखांचे लीड !

कारण त्यांना 272 या जादूई आकड्यापेक्षा काहीच जागा जास्त मिळाल्या आहेत. तर एनडीएतील मुख्य पक्ष भाजपला फक्त 242 वरच समाधान मानावे लागले आहे. परिणामी सात जागा असूनही शिंदेंचे केंद्रात वजन वाढले आहे. त्या जोरावर ते आपल्या पदरात दोन मंत्रीपदे (एक कॅबिनेट व दुसरे राज्यमंत्रीपद) पाडून घेणार असल्याचे समजते.

बारणेंसारखी हॅटट्रिक नोंदवलेले शिंदे यांचे पूत्र आणि कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत सभागृह नेता म्हणून निवड होणार आहे. त्यामुळे ते मंत्री होणार नाहीत. परिणामी बारणेंच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. बुलढाण्याचे खासदार प्रताप जाधव हेच काय ते बारणेपेक्षा वरिष्ठ आहेत. ते चौथ्यांदा निवडून आले आहेत.

Shrirang Barne
Maval Loksabha Election 2024 : मावळमध्ये बारणे आले पण लीड घटलं; 31 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

त्यामुळे त्यांचा व बारणेंचा मंत्री म्हणून विचार होऊ शकतो. त्यावर आज रात्री मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांदा निवडून आलेले हातकणंगलेचे तरुण खासदार धैर्यशील माने यांचाही मंत्री म्हणून विचार होऊ शकतो.

दरम्यान,बारणेंना संधी मिळाली,तर पिंपरी-चिंचवडचा मंत्रीपदाचा बॅकलॉग प्रथमच भरून निघणार आहे.कारण या पदाने उद्योगनगरीला आतापर्यंत नेहमीच हुलकावणी दिलेली आहे.राज्यातही या पदापासूनही शहर वंचितच राहिलेले आहे. बारणे यांनी लोकसभा अध्यक्षांच्या तालिकेवरही काम केले आहे.

Shrirang Barne
Maval Lok Sabha Constituency : पिंपरी आणि चिंचवडमधील नेत्यांवर भरवसा टाकला अन् तेथेच वाघेरेंचा गेम झाला !

सर्व पक्षांशीअसलेले त्यांचे चांगले सबंध आणि अनुभव जमेस धरता त्यांना मंत्रीपद मिळेल,असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या मर्जीतील ते आहेत. त्यामुळेच भाजपचा वरचष्मा आणि जास्त ताकद असूनही मावळात त्यांना शिंदेनी लोकसभेला पुन्हा संधी दिली. त्यांच्या प्रचारालाही मुख्यमंत्री खास आले होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com