Rohit Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rohit Patil : खबरदार! मी मैदानात आहे; रोहित पाटलांचा महायुती सरकारला इशारा

NCP SharadChandra Pawar Party Sangli MLA Rohit Patil Mahayuti government dance bar issue : राज्यात 'डान्स बार'वरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनी इशारा दिला आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : राज्यात पुन्हा डान्सबार सुरू करण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे. यावरून डान्स बारच्या नावाखाली राज्यातील संस्कृतीवर राज्य सरकार घाला घालत असल्याची ओरड विरोधकांनी सुरू केली आहे.

यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगलीतील आमदार रोहित पाटील यांनी राज्य सरकारला कडक इशारा देणारा प्रतिक्रिया समोर आली आहे.

महाराष्ट्रात डान्सबार सुरू करण्यासंदर्भात आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. डान्सबारसंबंधी नवीन कायद्यावर चर्चा झाली आहे. लवकरच हा कायदा विधानसभेत मांडला जाणार आहे. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानुसार जुन्या कायद्यात सुधारणा करून नवीन नियम लागू करण्याच्या तयारीत आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी (NCP) आघाडीच्या सरकारने 2005 मध्ये राज्यातील डान्सबारवर बंदी घातली होती. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तशी घोषणा केली होती. आर. आर. पाटील यांच्या या निर्णयाचे राज्यात जोरदार स्वागत झाले होते. मात्र, डान्सबार मालकांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवत काही नियम लागू करण्याचा आदेश दिला.

फडणवीस सरकारने पुढे ‘महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ ऑब्सेन डान्स इन हॉटेल्स, रेस्तराँ अँड बार रूम्स अँड प्रोटेक्शन ऑफ डिग्निटी ऑफ वुमन अ‍ॅक्ट 2016’ हा कायदा लागू केला. आता महाराष्ट्रात पुन्हा डान्सबार सुरू होण्याच्या हालचाली आहे. राज्य सरकार नेमकं काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT