BJP Politics : भाजपचं अजब पाॅलिटिक्स, दिल्लीचा सीएम कोण? नाव निश्चित नाही, तरी मंत्रिमंडळाच्या शपथविधीची तयारी

BJP swearing in ceremony cabinet February 20th Delhi Chief Minister : दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार, हे नाव निश्चित नसताना, भाजपने मंत्रिमंडळाच्या शपथविधीची तयारी केली आहे.
BJP Politics
BJP PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : दिल्लीत 27 वर्षांनंतर सत्तेत आलेल्या भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार, अशी चर्चा होत असतानाच, मंत्रिमंडळाचा शपथविधी 20 फेब्रुवारीला आयोजित केला आहे.

भाजपचे महासचिव विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी केली जात आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अनेक चेहरे आहे. यात 'आप'चे (AAP) नेते अरविंद केजरीवाल यांचा पराभव केलेले भाजपचे प्रवेश वर्मा यांचे नाव सर्वात जास्त चर्चेत आहे. यानंतर माजी प्रदेशाध्यक्ष विजेंद्र गुप्ता, सतीश उपाध्याय याची देखील नावे चर्चेत आहेत.

BJP Politics
Jagdeep Dhankhar : सीबीआय संचालक अन् निवडणूक आयुक्तांच्या निवडीत सरन्यायाधीश कशाला हवेत? उपराष्ट्रपती धनखड यांच्या प्रश्नाचे पडसाद

दिल्ली भाजप (BJP) विधीमंडळ पक्षाची बैठक मंत्रिमंडळाच्या शपथविधीपूर्वी बुधवारी होणार आहे. यात मुख्यमंत्रि‍पदाच्या नेत्याची निवड केली जाणार आहे. यासाठी दोन निरीक्षक नेमले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रि‍पदाच्या निवडीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

BJP Politics
Bihar Politics : बिहारमध्ये भाजपने जास्त जागा जिंकल्या तरी नितीश कुमारच होणार मुख्यमंत्री! काय आहे फाॅर्म्युला?

शपथविधी सोहळा गुरूवारी (ता. 20) होणार आहे. याच दिवशी म्हणजे, शपथविधीपूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची बैठक होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमिता शाह यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे प्रमुख नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील.

दिल्लीत नेमका कोणता पॅटर्न?

भाजपला दिल्लीत 27 वर्षानंतर सत्ता मिळाली आहे. इथं ताकदीचा नेत्याची मुख्यमंत्रि‍पदावर देण्याचा इरादा भाजप नेतृत्वाचा आहे. राजस्थान, हरयाना, मध्यप्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री नेमताना प्रस्थापितांचे नावं बाजूला ठेवत, नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे दिल्लीत नेमका कोणता पॅटर्न, मुख्यमंत्री देताना असेल, याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com