Vikas Lawande Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

20 Maharaj : पवारांच्या राष्ट्रवादीकडून 20 महाराजांची यादी जाहीर; वारकरी संप्रदायातील प्रतिगामी घुसखोरीचा आरोप

Vikas Lawande Statement : शरद पवारांच्या वारकरी लेखावरून वाद वाढत असताना विकास लवांडेंनी वारकरी संप्रदायातील २० घुसखोर महाराजांची नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे धार्मिक आणि राजकीय वातावरण अधिक तापले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Pune, 17 April : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वारकरी संप्रदायासंदर्भातील लेखावरून राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. भाजप आणि हिंदुत्ववांद्याकडून पवारांवर टीका केली जात आहे. त्याला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील २० घुसेखारांची नावे जाहीर केली आहेत. त्यावरून नवा वाद उभा राहू लागला आहे.

वारकरी संप्रदाय प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाली आहे, असे शरद पवार यांनी महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेत पवार यांनी या गोष्टीचा उहापोह केला आहे.

वारकरी संप्रदायातून हिंदुतत्वादी विचार मांडणाऱ्या वीस लोकांची नावे विकास लवांडे यांनी जाहीर केली आहेत. त्या वेळी ते म्हणाले, आमची लढाई राजकीय नसून ही सांस्कृतिक व वैचारिक संघर्ष आहे. आम्ही जी नावे जाहीर करणार आहोत, त्यांच्याशी आमचा वैयक्तिक कोणताही वाद, शत्रुत्व नाही.

हे लोक दररोज वारकरी संतपीठात येऊन नारदाच्या गादीवरून परधर्माचा द्वेष करणे, भेदनीती सांगणे, लोकांचा बुद्धीभेद करणे, रामकृष्ण हरी हा मंत्र पुसून जय श्रीराम हा नवीन मंत्र आणणे आणि वारकरी संप्रदायचे भगवीकरण करण्याचा प्रयत्न या लोकांकडून केला जात आहे, असा आरोपही लवांडे यांनी केला.

ते म्हणाले, अयोध्येच्या राम मंदिाराचे ट्रस्टी आहेत, ते गोविंद देवगिरी महाराज ज्यांचे मूळ नाव हे किशोर व्यास असे आहे. मध्यंतरी त्यांनी ज्ञानोबा-तुकोबांचे ग्रंथ नाहीत, असे वाद्‌ग्रस्त विधान केले होते. वारकरी संप्रदायाच्या टीका टिपण्णीनंतर त्यांनी माफी मागितली होती.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलेले वारकरी संप्रदायातील प्रतिगामी विचारसरणीचे घुसखोर पुढीलप्रमाणे

१) गोविंद देवगिरी महाराज

२) चारूदत्त आफळे (पुणे)

३) बंडातात्या कराडकर

४) प्रकाश जवंजाळ (बुलडाणा)

५) तुषार भोसले (भाजप वारकरी आघाडीचे प्रमुख)

६) अक्षय भोसले (शिंदेसेनेच्या वारकरी आघाडीचे)

७) संग्राम भंडारे (संगमनेरमध्ये धिंगाणा घालणारे)

८) योगी निरंजन (आळंदी देवस्थाने विश्वस्त, आरएसएसचा कट्टर प्रचारक)

९) एकनाथ सदगीर (ठाणे परिसर)

१०) ज्ञानेश्वर जळकीकर

११) संजय पाचपोर

१२) भास्कर गिरी महाराज देवगड

१३) संजयनाना धोंडगे

१४) राणा वास्कर

१५) चंद्रशेखर देगलूरकर (पंढरपूर)

१६) उदबोध पैठणकर

१७) श्याम राठोड (सध्या नाव बदलून वागणारे)

१८) किशोर शिवणीकर

१९) रामगिरी महाराज

२०) निरंजन कोठीकर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT