Solapur ZP Ceo : कुशल जैन यांनी स्वीकारला सोलापूर ZP ‘सीईओ’चा पदभार; कोणत्या कामाला प्राधान्य देणार हेही केले जाहीर...

Kushal Jain Appointment News : कुशल जैन यांनी सोलापूर झेडपी CEO म्हणून पदभार स्वीकारत उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन पाणीपुरवठा प्रश्नाला सर्वोच्च प्राधान्य देण्याची घोषणा केली.
Solapur ZP Ceo
Solapur ZP CeoSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 16 April : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कुशल जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जैन यांनी श्री सिद्धरामेश्वराचे दर्शन घेऊन गुरुवारी (ता. १६ एप्रिल) दुपारी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच जैन यांनी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याच्या विषयाला प्राधान्य देणार असल्याचे जाहीर केले आहे.

कुलदीप जंगम यांची पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे. जंगम यांच्या जागी सोलापूर झेडपीत (Solapur ZP) जैन यांची नियुक्ती राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. जैन यांची सीईओ म्हणून पहिलीच पोस्टिंग आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती होण्यापूर्वी कुशल जैन (Kushal Jain) हे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. तत्पूर्वी त्यांनी रोहा (जि. रायगड) येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे, त्यामुळे सीईओ म्हणून जैन यांची पाहिलीची पोस्टिंग आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर कुशल जैन म्हणाले, पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, सिद्धरामेश्वर यांच्या पावनभूमीत सेवा करण्याची संधी मिळणे, हे मी स्वतःचे भाग्य समजतो. सोलापूर जिल्ह्यात काम करायला मिळणे, ही अभिमानाची गोष्ट आहे.

Solapur ZP Ceo
Solapur ZP : शिंदेंच्या दोन शिलेदारांनी उधळला भाजपचा प्लॅन ; शिवसेनेलाही मिळाले झेडपीत मानाचे पान...

सोलापूर झेडपीच्या सीईओ पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जैन यांनी पाणीटंचाई कामच्या प्राधान्य देण्याचे जाहीर केले आहे. ‘जलजीवन मिशन’मध्ये सुरू असलेली कामे योग्यरितीने पूर्ण होतात की नाही, हे पाहिले जाईल. त्या योजनेच्या माध्यमातून ग्रामस्थांना दररोज पाणी मिळते का नाही, याची काटेकोर तपासणी केली जाईल, असेही स्पष्ट केले.

दरम्यान, मायक्रोसॉफ्ट कंपनीत काम करणारे कुशल जैन यांनी लोकसेवेसाठी मोठ्या पगाराची नोकरी सोडून आयएएस होण्यासाठी २०१८ मध्ये तयारी सुरू केली. जैन हे २०२१ च्या परीक्षा क्रॅक करण्यात यशस्वी ठरले. संपूर्ण भारतात ते ४० वा क्रमांक पटकावून उत्तीर्ण झाले होते.

Solapur ZP Ceo
Ranjitsinh Mohite Patil : भाजपने दूर केलेले मोहिते पाटील आता शिवसेनेकडून आमदार होणार? एकनाथ शिंदेंसोबत वाढली जवळीक

जैन हे मूळचे मध्य प्रदेशमधील जबलपूरचे आहेत. आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सुरुवातीला त्यांना आंध्र प्रदेश केडर मिळाले होते. मात्र महाराष्ट्र केडरमधील आयपीएस अधिकारी वृष्टी जैन यांच्याशी विवाह केल्यामुळे आंतर केडर बदलीद्वारे ते महाराष्ट्र केडरमध्ये आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com