NCP
NCP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

माढ्यात स्वबळावर लढणार पण,..

सरकारनामा ब्यूरो

माढा : माढा नगरपंचायतीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) चिन्हावर लढवणार असून आघाडी व युतीचे पर्यायही खुले आहेत. वेळप्रसंगी स्वबळावरही निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे (Ranjitshingh Shinde) यांनी घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

माढा नगरपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. शनिवारी (ता. 27 नोव्हेंबर) रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक रणजितसिंह शिंदे व माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार भांगे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी शिंदे यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली.

झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, मागील निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवली गेली होती. त्यामुळे यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर माढा नगरपंचायतीची निवडणूक लढविणार आहोत. पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने नगरपंचायत निवडणुकीतील आघाडी अथवा युतीचे सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. गरज पडल्यास मागील निवडणुकीप्रमाणे पक्ष स्वबळावरही निवडणुकीला सामोरे जाऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी रणजितसिंह शिंदे, झुंजार भांगे, माजी विरोधी पक्षनेते चंद्रशेखर गोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दत्ता आंबुरे, शहाजी चवरे, नागनाथ शिवपुजे, बाळासाहेब भांगे, सोमनाथ चवरे, सुहास चवरे, भारत टिंगरे, विकास धोत्रे, उत्तम पालकर, बाबाराजे मस्के, अमोल खरात, अशोक सुळे, बाळासाहेब चव्हाण, सिद्धेश्वर मारकड, प्रसाद भास्करे, नाना गाडे, राजू भांगे, संतोष पाडुळे, महेश भांगे, शिवाजी भांगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

साठे गटाची बोलावली बैठक

माढा नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने साठे गटाने कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करण्यासाठी सोमवारी (ता. 29 नोव्हेंबर) सायंकाळी 7 वाजता माढ्यातील जगदाळे मंगल कार्यालयात माजी आमदार धनाजीराव साठे, संत कुर्मदास कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे, माजी नगराध्यक्षा मीनल साठे यांच्या उपस्थितीत बैठक बोलावली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT