उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी करत आहे.
जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी पक्षाच्या मोर्चेबांधणीसह नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पूर्ण झाल्याचे सांगितले आणि २५ जागांवर विजयाचा विश्वास व्यक्त केला.
निवडणुका महायुतीच्या माध्यमातून की स्वतंत्रपणे लढवायच्या, याचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील; त्यासाठी १४ ऑक्टोबर रोजी मुंबईत बैठक होणार आहे.
Karad, 11 October : उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस सातारा जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढवणार आहोत. आगामी निवडणुकांसाठी पक्षीय पातळीवर आमची तयारी सुरु आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुमारे २५ जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) कऱ्हाड दक्षिणच्या अध्यक्षपदी डॉ. सुधीर जगताप, महिला आघाडीच्या अध्यक्षपदी दीपाली जाधव, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर सोळसकर बोलत होते.
सोळसकर म्हणाले, आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. कऱ्हाड दक्षिण नंतर कऱ्हाड उत्तर, पाटण आणि अन्य तालुक्यांतील निवडी तातडीने केल्या जातील. त्या सर्व नवनिर्वाचीत तालुकाध्यक्ष व पदाधिकारी यांना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील (Makarand Patil), खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात येतील.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची तयारी सुरु आहे. त्याअंतर्गत प्रत्येक तालुक्यात निवडी करुन तेथील जबाबदारी जबाबदार नेत्यांवर देवून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुका लढवल्या जाणार आहेत. आगामी निवडणुका या महायुती म्हणून की स्वतंत्रपणे लढवायच्या याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षाचे नेते घेतील. मात्र, कार्यकर्त्यांची बांधणी करण्याचे काम आम्ही जिल्ह्यात सुरु ठेवले आहे.
ते म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी प्रवेश केल्यामुळे आमच्या पक्षाची ताकद कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात वाढली आहे. त्यामुळे यावेळच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका या ॲड. उंडाळकर, राजेश पाटील-वाठारकर तर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी विजय यादव यांच्यावर जबाबदारी देणार आहोत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत निवडणुका लढवण्यासाठी तसारी सुरु आहे. आगामी निवडणुकांसाठी पक्षीय पातळीवर आमची तयारी सुरु आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुमारे २५ जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार निवडून येतील, असा दावाही सोळसकर यांनी केला.
अजितदादांसोबत मंगळवारी बैठक
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाचे खासदार, आमदार, मंत्री यांची बैठक घेतली. आता राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक उपमुख्यमंत्री पवार यांनी मंगळवारी (ता. १४) मुंबईत बोलावली आहे. त्यामध्ये जिल्ह्याचा आढावा मी देणार आहे, असे सांगून जिल्हाध्यक्ष सोळसकर म्हणाले, आगामी निवडणुकांसाठी पक्षीय पातळीवर की महायुतीच्या माध्यमातून लढायचे, याचाही माहिती आम्हाला त्या बैठकीत मिळेल.
प्रश्न 1 : राष्ट्रवादी काँग्रेस सातारा जिल्ह्यातील निवडणुका कोणाच्या मार्गदर्शनाखाली लढवणार आहे?
उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली.
प्रश्न 2 : जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी किती जागांवर विजयाचा दावा केला?
सुमारे २५ जागांवर.
प्रश्न 3 : आगामी निवडणुका महायुतीतून की स्वतंत्रपणे होणार?
याचा निर्णय अजित पवार घेतील.
प्रश्न 4 : पुढील पक्षीय बैठक कधी आणि कुठे होणार आहे?
१४ ऑक्टोबर रोजी मुंबईत अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.