Jayant Patil: राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूर लोकसभेला उमेदवार म्हणून प्रदेशाध्यक्षांनी हे नाव केले जाहीर

Shirur Lok Sabha Constituency 2024: शिरूर लोकसभेचा आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार ठरला, महायुतीची चर्चाच
Jayant Patil, Amol Kolhe
Jayant Patil, Amol KolheSarkarnama
Published on
Updated on

Pimpri: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ त्यांचे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर त्यांनी शरद पवार गटाला राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असे नाव तात्पुरते दिले. त्यानंतर लगेच हा पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीलाही लागला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल (ता.८) शिरूर लोकसभा मतदारसंघाचा झंझावाती दौरा केला.

शिरूरमध्ये मोडणाऱ्या पुण्यातील हडपसरनंतर पिंपरी-चिंचवडमधील भोसरी विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक पाटील यांनी सायंकाळी मोशी येथे घेतली. तीन तास तिला उशीर झाला. त्यामुळे औपचारिक भाषणाच्या फंदात न पडता त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या वेळी आगामी लोकसभेला शिरूरमध्ये पक्षाचे (आघाडी) उमेदवार विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे असतील,असे त्यांनी जाहीर केले. कोल्हेंच्या नावाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अगोदरच ग्रीन सिग्नल दिलेला आहे.

Jayant Patil, Amol Kolhe
Nikhil Wagle: निखिल वागळेंवर पुण्यात गुन्हा दाखल; 'निर्भय बनो ' सभा वाद पेटणार?

काही पक्ष सोडून गेले, तरी नाऊमेद होऊ नका. कारण मतदार हा जागेवरच असतो. त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी नवी यंत्रणा (बूथरचना) तयार करा, असे पाटील म्हणाले. निवडणूक आयोगाच्या निर्णय़ानंतर पवारसाहेबांविषयी मतदारांत सहानुभूती असली, तरी त्यांच्यापर्यंत पोहाेचले पाहिजे. त्यासाठी ग्राउंडवर काम करणारे तरुण तयार केले, तर सोपे जाईल,असा कानमंत्र त्यांनी दिला. १५ दिवसांत बूथरचना झाली, तर शरद पवारांची बैठक भोसरीत घेऊ,असा शब्द त्यांनी दिला. त्याचवेळी पक्षात गटबाजी वाढायला लागल्याबद्दल त्यांनी कानपिचक्या दिल्या. त्यांच्या या वक्तव्यामुळे पिंपरी-चिंचवड पक्षातील गटबाजी काही संपेना या हेडिंगने 'सरकारनामा'ने दिलेल्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले.

युतीकडून शिरूर राष्ट्रवादी लढणार की शिवसेना हेच ठरेना

शिरूरला आघाडीचा उमेदवार ठरला,पण युतीचे अजून तळ्यात-मळ्यातच आहे. त्यांच्यात ही जागा शिंदे शिवसेनेला जाण्याची शक्यता असून, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचे नाव त्यासाठी घेतले जात आहे, तर अजित पवार यांनी शिरूर प्रतिष्ठेचा प्रश्न केला असून, कोल्हे हे कसे पुन्हा निवडून येतात हेच पाहतो, असे खुले आव्हान दिले आहे. त्यामुळे त्यांच्या मनात कोण उमेदवार आहे वा ही जागा युतीत शिंदे शिवसेनेऐवजी त्यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस लढणार आहे का हे निश्चित झालेले नाही. मूळात तेथे युतीकडून राष्ट्रवादी की शिवसेना लढणार हे फायनल झाले नसल्याने तेथील त्यांचा उमेदवार नक्की झालेला नाही. मात्र, दोन्हीकडून आढळराव यांचेच नाव उमेदवार म्हणून घेतले जात आहे, हे विशेष.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com