Mahesh Shinde, Shashikant Shinde
Mahesh Shinde, Shashikant Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Koregaon News: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना फसवून विरोधकांनी घेतला पक्ष प्रवेश : शशिकांत शिंदे

राजेंद्र वाघ

Koregaon News : मध्वापूरवाडीसह कोरेगाव मतदारसंघातील (Koregaon) काही गावांमधील राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांना फसवून त्यांचा विरोधी गटात प्रवेश घडवून आणला. मात्र ते आजही आणि यापुढेही राष्ट्रवादीसोबत कायम राहणार असल्याचे संबंधित कार्यकर्त्यांनी मला प्रत्यक्ष भेटून सांगितले आहे. त्यामुळे अशा प्रकारचे खोटे पक्ष प्रवेश घडवून आणणाऱ्या विरोधकांचे पितळ उघडे पडले आहे, अशा शब्दांत आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.

ध्वापूरवाडी (ता. कोरेगाव) येथील सरपंच अनिकेत सूर्यवंशी, उपसरपंच अमोल नामदास, बजरंगगिरी महाराज, अभिजित भोसले, शिरीष भोसले, अनिल पिसाळ, अशोक पिसाळ, चेतन सूर्यवंशी, अभिजित पिसाळ, फारुख सय्यद, आसिफ भालदार, अनिमिष पिसाळ, हणमंत कदम, किरण नामदास, जमीर भालदार आदींसह ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी राजेंद्र भोसले, किशोर ना. बर्गे, नितीन लवंगारे यांच्यासमवेत आमदार शशिकांत शिंदे यांची ल्हासुर्णे येथील निवासस्थानी भेट घेतली.

या वेळी स्पष्टीकरण देताना सरपंच अनिकेत सूर्यवंशी म्हणाले, ‘‘गावातील विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी आमदार महेश शिंदे यांच्याकडे जायचे आहे,’’ असे कारण सांगून त्यांचे स्थानिक कार्यकर्ते आम्हाला तिकडे घेऊन गेले; परंतु तेथे जाताच आमच्या गळ्यात स्कार्फ टाकून आमचे फोटो काढले गेले. हे सर्व आम्हाला अनपेक्षित होते. त्यामुळे विरोधकांनी आमची फसवणूक केली आहे. आजही आणि यापुढेही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी कायम राहणार असल्याची ग्वाही देत आहोत.

त्यावर आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, ‘‘मध्वापूरवाडी (गणेशवाडी) येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विरोधकांकडून जो अनुभव आला आहे, तसाच अनुभव अंगापूर वंदन, चिंचणेर निंब, कोलवडी, गोगावलेवाडीसह अन्य काही गावांतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही आला आहे. त्याबाबतचा खुलासा या गावांतील राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी माझी प्रत्यक्ष भेट घेऊन केला आहे.

’’ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पक्षासोबत प्रामाणिक राहून कार्यरत असल्याची प्रचिती यानिमित्ताने येत आहे, असेही आमदार शशिकांत शिंदे यांनी या वेळी स्पष्ट केले. याप्रसंगी राजेंद्र भोसले, किशोर ना. बर्गे यांनीही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पक्षाच्या व आमदार शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT