Koregaon : कोरेगावात चक्क पाच सभामंडप चोरीला... महेश शिंदेंचा गौप्यस्फोट

Mahesh Shinde आमदार महेश शिंदे यांच्या विशेष प्रयत्नांतून ल्हासुर्णे (ता.कोरेगाव) येथे सुमारे दोन कोटी रूपये खर्चाच्या विकास कामांचे भूमिपूजन झाले.
MLA Mahesh Shinde
MLA Mahesh Shindesarkarnama

Koregaon News : कोरेगाव तालुका पंचायत समितीचे कामकाज इतके आदर्श आहे की, ज्या पद्धतीने मकरंद अनासपुरेंच्या Makrand Anaspure एका चित्रपटात एक विहिरी चोरीला गेली होती. तशाच पद्धतीने आपल्या कोरेगाव पंचायत समितीतून तब्बल पाच सभामंडप चक्क चोरीला गेले आहेत, असा गौप्यस्फोट आमदार महेश शिंदे Mahesh Shinde यांनी केला.

आमदार महेश शिंदे यांच्या विशेष प्रयत्नांतून ल्हासुर्णे (ता.कोरेगाव) येथे सुमारे दोन कोटी रूपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी श्री नवलाई देवी मंदिरात झालेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राहुल प्र. बर्गे, जयवंत पवार, संतोष जाधव, संजय काटकर, नवनाथ केंजळे, विजयराव चव्हाण, हणमंत जगदाळे, सुनील वाघ, जवानसिंह घोरपडे, सुनील वाघ, रमेश माने, ल्हासुर्णेचे सरपंच संतोष चव्हाण, उपसरपंच राजाराम चव्हाण आदी उपस्थित होते.

आमदार शिंदे म्हणाले, मध्यंतरी एकदा गटविकास अधिकाऱ्यांनी तालुक्यामधील विकासकामे निश्चित करण्यासाठी बोलवलेले होते. तेव्हा मी आणि संतोषआबा गेलो. कामांची यादी पुढे आली तर त्यातील दोन कामे झालेली होती. इतर तीन कामे मंजूर ही नसताना मार्चमध्येच बिले काढली होती. तत्पूर्वी अनुदान लाटलेले होते. इतके आदर्श काम लक्षात आल्यावर अभ्यास केला असता तब्बल पाच सभामंडप चोरीला गेल्याचे लक्षात आले.

MLA Mahesh Shinde
Satara Politics : कार्यकर्त्यांनी आग्रह केला अन् महेश शिंदे....

आमदार शिंदे म्हणाले, पंचायत समिती, जिल्हा परिषदेतून आपण सर्वसामान्य माणसाला सुखी करणे शक्य होते. म्हणून आपल्याला जिल्हा परिषद, पंचायत समिती ताब्यात हवी आहे. कोण निवडून येतो हे न पहाता आपल्या संघटनेचा माणूस निवडून आला पाहिजे यासाठी आतापासून कामाला लागावे."

MLA Mahesh Shinde
Satara : छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास भाजपने आम्हाला सांगू नये… शशिकांत शिंदे

आमदार शिंदे म्हणाले,गेल्या काही वर्षात इथे कंत्राटदार विकास काम कोठे करायचे हे ठरवत असत. मात्र, आता आपला सामान्य कार्यकर्ता विकास काम नेमके कोठे करायचे हे ठरवतो. हे परिवर्तन आपण घडवलेले आहे. असे काम (कै.) शंकररावअण्णा जगताप कायम करत आले. डॉ. शालिनीताई पाटील यांनाही तसेच काम अभिप्रेत आहे. त्यांचाच आदर्श घेऊन आपण काम करत आहोत

MLA Mahesh Shinde
Satara : ठाकरे सेना तुम्हीच राष्ट्रवादीच्या मांडीवर नेऊन बसवली... शंभूराज देसाई

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com