पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीचा ग्रामपंचायत सदस्यही कोटींची कामे आणून आमच्या छाताडावर नाचतो : सावंतांची खदखद!

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) ग्रामपंचायत सदस्यदेखील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याकडे जाऊन २५-१५ योजनेतून एक-एक, दीड-दीड कोटी रुपयांची कामे आणतो आणि येथे येऊन आमच्या छाताडावर नाचतो. जे आमदाराला मिळत नाही, ते यांच्या ग्रामपंचायत सदस्यांना मिळते. आम्हाला केवळ गोड बोललं जात, अशी खंत व्यक्त करत शिवसेना (shivsena) आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी ‘आमच्यामुळे हे सत्तेत आले. आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमचीच घडी विस्कटण्याचा प्रयत्न ते करत आहेत, ते आम्ही खपवून घेणार नाही,’ असा इशाराही त्यांनी दिला. (NCP's Gram Panchayat member also brings one crore works : Tanaji Sawant)

सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुरात युवा सेनेचा सोमवारी (ता. २८ मार्च) मेळावा झाला. त्यात सावंत यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर चौफर टीका करत सभागृह दणाणून सोडले. ही सत्ता तुम्ही स्वप्नात तर पहिली होती का? ज्यांनी तुम्हाला सत्ता अनुभवायला दिली, तुम्ही त्यावरच अन्याय करता. महाविकास आघाडीच्या मागील अडीच वर्षांच्या काळात आपला केवळ अपमानच झाला आहे. आपला केवळ अपमानच होणार असेल, तर साहेब विचार करायला हवा, असे आवाहन त्यांनी युवा सेनेचे सचिव सरदेसाई यांना केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा ग्रामपंचायत सदस्यदेखील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे जाऊन २५-१५ योजनेतून एक एक, दीड दीड कोटी रुपयांची कामे आणतो आणि येथे येऊन आमच्या छाताडावर नाचतो. जे आमदाराला मिळत नाही, ते यांच्या ग्रामपंचायत सदस्यांना मिळते. आम्हाला केवळ गोड बोललं जात. आमच्यामुळे हे सत्तेत आले. शिवसेना समोरासमोर लढते. आमच्या पक्षप्रमुखांशी वेगळी भाषा आणि शिवसैनिकांशी वेगळी वागणूक ही त्यांचं चाललं आहे. यांचा ग्रामपंचायत सदस्यही कोटी कोटी दोन-दोन कोटींची कामे आणतो. त्यात चाळीस लाख रुपये कमवायचे आणि आमच्या शिवसैनिकांनी शिवभोजन थाळी चालवायची आणि बिल यायची वाट बघत बसायची, हे चालणार नाही, असा इशाराही त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना दिला.

सावंत म्हणाले की, मागील अडीच वर्षांत विविध ठिकाणच्या शिवसैनिकांना फोडल्याचे दाखले देत तानाजी सावंत यांनी अन्यायचा पाढा वाचला. ते म्हणाले की, एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये, असे ठरलेलं असताना का असं होतं? आमच्या नादाला लागू नका, तुम्ही शंभर मारले आणि आमचा एकच दणकट बसलं की आईचे दूध आठवेल कोल्हापुरात आमची जागा असूनही आम्ही महाविकास आघाडीत ठरल्याप्रमाणे ती जागा काँग्रेसला सोडली. कोल्हापुरात पूर्वी शिवसेनेचे सहा आमदार होते, आता केवळ दोनच आमदार आहेत. या असल्या गोष्टींमुळे संख्याबळ घटले आहे.

आम्ही केवळ आदेशाची वाट बघतोय, जोपर्यंत सहन होईल, तोवर सहन करू. आम्हाला सत्तेत बसायची सवय नाही. सत्तेत सोबत आहात ना? मग आमच्यावर कशाला वार करता? केवळ स्टेजवर बोलण्यापुरते भाजपवाले तुमचे विरोधक आहेत का? की आतून तुमची त्यांच्याशी सेटिंग आहे? शिवसेना विश्वासघात सहन करणार नाही, असा संदेश काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाला देण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT