ते खोटे निघाले तर मी राजकीय संन्यास घेतो : जगतापांचे बागलांना खुले आव्हान

‘आदिनाथ’चे साहित्य ‘मकाई’ला नेऊन बसवलं : जयवंतराव जगतापांचा बागलांवर आरोप
Jayantrao Jagtap-Rashmi Bagal
Jayantrao Jagtap-Rashmi BagalSarkarnama
Published on
Updated on

करमाळा (जि. सोलापूर) : आदिनाथ सहकारी साखर कारखाना (Adinath Sugar Factory) भाडेतत्त्वावर देताना बागलांनी काय विचार केला? हे त्यांनाच विचारा. ज्यांनी कारखाना बंद पाडला, त्याचे काय? आदिनाथ कारखान्याचा गिअर बाॅक्स ‘मकाई’ला नेऊन बसवला आणि तो कारखाना या वर्षी सुरू केला. आदिनाथ बंद पाडून त्याचे साहित्य ‘मकाई’ला नेऊन बसवले आहे. हे जर खोटे निघाले, तर मी राजकीय संन्यास घेतो , असे खुले आव्हान करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप (Jayantrao Jagtap) यांनी बागलांना दिले. (Former MLA Jayantrao Jagtap's open challenge to Bagal group)

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सध्या सुरू असलेल्या विषयवार आदिनाथ बचाव आणि बारामती ॲग्रो यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादावर माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी रविवारी (ता. २७ मार्च) आपली भूमिका स्पष्ट केली. आदिनाथविषयी भूमिका मांडत असताना जगताप यांनी सत्ताधारी बागल गटांवरही जोरदार टीका केली.

Jayantrao Jagtap-Rashmi Bagal
राजू शेट्टींच्या मनात चाललंय तरी काय... अजितदादांचे कौतुक करत मुख्यमंत्र्यांना चिमटा!

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना पवारच चालवू शकतात. उगीच कुणी काहीही करण्यात काही उपयोग नाही. हा कारखाना आमदार रोहित पवार यांच्या ‘बारामती ॲग्रो’ने भाडेतत्त्वावर चालवाला घेतला आहे आणि  आदिनाथ हा फक्त पवारच चालवू शकतात. पवारांनी जर ‘आदिनाथ’मधील लक्ष काढले, तर तो चालूच होऊ शकत नाही. ‘आदिनाथ बचाव’ला काय अधिकार आहेत? ‘आदिनाथ बचाव’मधील सदस्यांना फारच पुळका असेल तर त्यांनी स्वतःच पैसे टाकावेत आणि आदिनाथ सुरू करावा, असे आव्हान माजी आमदार जगताप यांनी दिले.

Jayantrao Jagtap-Rashmi Bagal
आता माझी बायकोही म्हणेल आपण नव्यानं लग्न करू : अजितदादांची भरसभेत मिश्किली!

जयवंतराव जगताप म्हणाले की, आदिनाथ कारखान्याच्या स्टोअरमधील समानाची चोरी झाल्याचे सांगून ते साहित्य बागलांनी मकाई कारखान्याला नेले आहे. आदिनाथ कारखान्याचे ८ कोटी ४० लाख रूपये अनाधिकृतपणे ट्रान्सफर केले आहेत. मकाई कारखान्याने आदिनाथचे २ कोटी ३० लाख दिले नाहीत. बागलांनीच आदिनाथ कारखाना संपवलाय. माजी आमदार श्यामलताई बागल यांच्या काळात ऊस वाहतूक वाहनांचे बोगस करार केले. सुमारे २० कोटी रूपयांचे अ‍ॅडव्हान्स कागदोपत्री दाखवले.

Jayantrao Jagtap-Rashmi Bagal
'शिवसेनेच्या माजी आमदाराने आदित्य ठाकरेंचा आदेश झुगारला'

उस्मानाबाद जिल्ह्यातील बंद पडलेले पाण्याचे ११ टॅंकर  व ऑटो रिक्षाच्या नावे वाहनांसाठी पैसे वाटले. या रिक्षाचे व टॅकरचे नंबर देऊन पैसे नातेवाईकांच्या नावे काढले आहेत. ते अद्याप वसूल केले नाहीत. हे खोटे निघाले तर मी राजकीय संन्यास घेईन. सध्याची कारखान्याची परिस्थिती बघता  पवारांशिवाय अन्य कुणी कारखाना सुरू करेल, असे वाटत नाही, असेही जगताप यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com