Rupali chakankar - Vidya Chavan Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

रूपाली चाकणकर मंदिरात गेल्या, तेवढ्यात विद्या चव्हाणांनी व्यासपीठ सोडले; गटबाजीने पदाधिकारी हैराण!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली चाकणकर आणि विद्या चव्हाण यांच्यातील गटबाजी पंढरपुरात उघड

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील भाळवणी येथे नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचा (ncp) महिला मेळावा पार पडला. त्यावेळी राष्ट्रवादीच्या प्रदेश पातळीवरील दोन महिला नेत्यांमधील गटबाजीचे दर्शन येथील महिला पदाधिकाऱ्यांना झाले. (NCP's Rupali Chakankar and Vidya Chavan's factionalism exposed in Pandharpur)

पंढरपूर तालुका महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्ष राजेश्री ताड यांनी भाळवणी येथे महिला व युवक मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar), प्रदेश महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्ष विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते. त्यानुसार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष विद्या चव्हाण या दोघींनीही या मेळाव्याला एकाचवेळी हजेरी लावली, पण त्या एकमेकींना न बोलता, न भेटताच निघूनही गेल्या. दोन महिला नेत्यांच्या या अबोलाची सध्या तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे.

मेळाव्याची वेळ दुपारी चार वाजता होती. पण, प्रत्यक्षात मेळावा सायंकाळी सात वाजता सुरु झाला. त्यामुळे दुपारपासून तिष्ठत बसलेल्या अनेक महिलांनी कार्यक्रमापूर्वीच काढता पाय घेतला. सायंकाळी सात वाजता महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण कार्यक्रमस्थळी दाखल झाल्या. त्यानंतर मागोमाग महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर याही कार्यक्रमस्थळी दाखल झाल्या.

रुपाली चाकणकर या महिला राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उदघाटन करत असताना विद्या चव्हाण मात्र कार्यक्रमाच्या व्यासपीठावर होत्या. त्याच दरम्यान रुपाली चाकणकर या व्यासपीठाला लागून असलेल्या शांकबरी मंदिरात दर्शनासाठी गेल्या, तेवढ्यात विद्या चव्हाण लगबगीने व्यासपीठ सोडून तेथून निघून गेल्या. एकाच कार्यक्रमासाठी आलेल्या विद्या चव्हाण आणि रुपाली चाकणकर यांनी एकमेकीकडे न पाहता, न बोलता आणि न भेटता परस्पर निघून गेल्या. त्यांच्यातील या विसंवादामुळे उपस्थित महिला कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना काय बोलावे हेच सुचेना.

त्या आल्या...त्यांनी पाहिलं आणि न बोलताच त्या निघून गेल्याची चर्चा तालुक्यात सध्या सुरु आहे. या बाबत संयोजकांना विचारलं असता त्यांनी प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांना रेल्वेने जायचं असल्याने त्या तातडीने गेल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT