‘मातोश्रीच्या खजिनदारा’चा पापाचा घडा भरलाय : रवि राणांनी डागली तोफ

आमदार रवि राणा यांची परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका
Anil Parab-Ravi rana
Anil Parab-Ravi ranaSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ‘मातोश्री’चे खजिनदार असलेले परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) हे ‘कलेक्शन‘ करून ‘मातोश्री’वर पोचवाचे. सचिन वाझे याच्या माध्यमातून परब यांनी अनेक कामे करून घेतली आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा छळ करणारे, नवनीत राणांसाख्या (Navneet Rana) महिला खासदाराला जेलमध्ये टाकणाऱ्या अनिल परब यांच्या पापाचा घडा आता भरला आहे, त्यामुळे केलेल्या पापाची शिक्षा त्यांना नक्की मिळणार आहे, अशी जळजळीत टीका आमदार रवि राणा (Ravi Rana) यांनी परब यांच्यावर केली. (MLA Ravi Rana criticizes Anil Parab)

सक्तवसुली संचनालयाकडून (ईडी) आज सकाळपासून परिवहन मंत्री परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. त्यानंतर आमदार रवि राणा यांनी परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित विविध सात ठिकाणांवर ईडीने आज (ता. २६ मे) छापे टाकले आहेत. परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सर्वात जवळचे मंत्री असून, मातोश्रीचे खजिनदार आहेत. मातोश्रीचे खजिनदार म्हणून सरकारचं कलेक्शन करून ते मातोश्रीवर पोचविणे. सचिन वाझे याच्या माध्यमातून अनेक कामं अनिल परब यांनी करून घेतली आहेत.

Anil Parab-Ravi rana
चंद्रकांतदादा, आम्हीही खूप काही बोलू शकतो; पण... : अजितदादांनी सुनावले

एसटी महामंडळात परब यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी यंदा दिवाळी केली नाही, त्यांची दिवाळी अंधारात गेली. त्यांनी आठ ते दहा महिने आंदोलन केले. पण, परिवहन मंत्री अनिल परब यांनी उर्मट भाषेत आणि अहंकारामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा छळ केला, त्यामुळे दीडशेपेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांचा शाप अनिल परब यांना लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हाताशी धरून अनेक कारस्थानं त्यांनी केलेली आहेत. त्या सर्वांचा आता भांडाभोड होणार आहे, असा दावा आमदार राणा यांनी केला आहे.

Anil Parab-Ravi rana
भरणेंसारखी जिगर सोलापुरातील नेते दाखवणार का?

ते म्हणाले की, अनिल परब लवकरचे जेलमध्ये जातील, असे संकेत आहेत. कारण, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अनिल परब यांनी नवनीत राणा यांच्यासारख्या महिला खासदाराला कारागृहामध्ये टाकले. हनुमान चालिसाचा अपमान केला. त्यामुळे भगवंतांचा जो अपमान परब यांनी केला आहे, त्याची शिक्षा अनिल परब यांना नक्की मिळणार आहे. परब यांच्या पापाचा घडा पूर्णपणे भरलेला आहे. मराठी माणसांना फसवून त्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारे परब जेलमध्ये जातील, त्यानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे आणि खासदार संजय राऊत यांचेही कारनामे बाहेर निघणार आहेत. निष्पक्षपणे ईडी ही कारवाई करेल आणि भ्रष्टाचाऱ्यांना जेलमध्ये टाकेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com