Rohit Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad News : राष्ट्रवादीची नाळ सर्वसामान्यांशी; काहीही फरक पडणार नाही...रोहित पाटील

Rohit Patil रोहित पाटील कराडच्या प्रीतीसंगमावर आले असता बोलत होते ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तळागाळापर्यंत घराघरापर्यंत पोचलेला पक्ष आहे.

Umesh Bambare-Patil

-हेमंत पवार

Karad NCP News : सर्वसामान्यांची नाळ सर्वसामान्यांची नाळ ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांशी जोडली गेल्यामुळे जोपर्यंत सर्वसामान्य माणूस पक्षासोबत आहे, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला काहीही फरक पडणार नाही, असे स्पष्ट मत माजी उपमुख्यमंत्री कै. आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये NCP फूट पडल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar हे कराड येथील जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी दाखल झाले. त्यासाठी रोहित पाटील Rohit Patil कराडच्या प्रीतीसंगमावर आले असता त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. रोहित पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तळागाळापर्यंत घराघरापर्यंत पोचलेला पक्ष आहे.

निश्चितपणे पक्ष सर्वसामान्यांच्या ताकदीवर पुन्हा उभा राहील. जे आमदार भाजप सोबत गेले आहेत ते परत येतील की नाही याबाबत आत्ता सांगू शकत नाही. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्रातील अनेक तरुणांचे आदर्श आहेत. सर्वसामान्यांची नाळ पवार साहेबांशी जोडली गेल्यामुळे जोपर्यंत सर्वसामान्य माणूस आहे, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला काही फरक पडणार नाही.

आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही यापुढे वाटचाल करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वसामान्यांसाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महिलांना आरक्षण देण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा उभा राहील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT