Gopichand Padalkar- Vidya Chavan Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर हे तर मंगळसूत्र चोरून आमदार झालेत : राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाणांचा गंभीर आरोप

विद्या चव्हाण यांनी केलेल्या टीकेनंतर आता भाजप नेते कशा पद्धतीने उत्तर देणार याकडे लक्ष लागले आहे.

भारत नागणे

पंढरपूर : भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रांची चोरी करून आमदार झाले आहेत, त्यांचा वापर बारामतीकरांच्या विरोधात भुंकण्यासाठीच केला जातो, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी आज (ता. १ डिसेंबर) पंढरपुरात केला. (NCP's Vidya Chavan made serious allegations against Gopichand Padalkar)

विद्या चव्हाण या आज पंढरपुरात एका खासगी कार्यक्रमासाठी आल्या होत्या, यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना भाजपचे नेते, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

विद्या चव्हाण म्हणाल्या की, आमदार गोपीचंद पडळकर यांना डोके नाही, ते फक्त राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार यांच्या विरोधात भुंकत असतात. त्यांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून आमदारकी मिळवली आहे, असा थेट गंभीर आरोप केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

पंढरपुरात तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यामध्ये येथील होळकर वाड्याचा समावेश करण्यात आला आहे. यावरून विद्या चव्हाण यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वतःला रामाचे भक्त म्हणून घेणाऱ्यांना अहिल्याबाई होळकरांनी बांधलेल्या राम मंदिराची तरी माहिती आहे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

या वेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. देवेंद्र फडणवीस यांना मंदिर परिसरातील लोकांची घरे दारे पाडून विकास करायचा आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला. विद्या चव्हाण यांनी केलेल्या टीकेनंतर आता भाजप नेते कशा पद्धतीने उत्तर देणार याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT