Gram Panchayat Election : इच्छुकांनी मानले अजितदादांचे आभार ; निवडणूक आयोगाकडून मोठा बदल

Gram Panchayat Election : निवडणूक आयोगाची वेबसाईट बंद झाल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक इच्छुकांची बुधवारी चांगलीच धावपळ झाली.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Gram Panchayat Election: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. शुक्रवारी (ता.२) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. पण निवडणूक आयोगाची वेबसाईट बंद झाल्याने इच्छुकांसमोर अडचण निर्माण झाली होती . त्यांची अडचण विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दूर केली आहे. (Ajit Pawar on Gram Panchayat Election news update)

निवडणूक आयोगाची वेबसाईट बंद पडल्याने कालपासून (बुधवारी) अनेक इच्छुकांची धावपळ सुरु होती. मुदतीच्या आत अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची मोठी कसोटी सुरु होती. निवडणूक आयोगाची वेबसाईट बंद झाल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक इच्छुकांची बुधवारी चांगलीच धावपळ झाली. राज्यभरात हा गोंधळ उडाला होता.

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या (शुक्रवार) शेवटची तारीख आहे. त्यासाठी अनेक इ्च्छुकांनी यासाठी बुधवारची रात्र जागवून काढली. उमेदवार दोन दिवसापासून अर्ज भरण्याचा प्रयत्न करीत आहे. ऑफलाइन अर्ज भरण्याची मागणी यानिमित्ताने पुढे आली होती.

Ajit Pawar
Gujarat Election 2022 : मतदानाला गालबोट ; भाजप उमेदवारावर हल्ला ; काँग्रेस-भाजपचे कार्यकर्ते भिडले

ऑफलाइन अर्ज भरण्याची मागणीबाबत विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी निवडणुक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर ग्रामपंचायतीसाठी ऑफलाइन अर्ज भरण्याची परवानगी आयोगाने दिली आहे. त्यामुळे आजपर्यंत अर्ज न भरलेल्या इच्छुकांना दिलासा मिळाला आहे.

निवडणूक आयोगाने केला हा बदल

राज्य निवडणूक आयोगाने 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 (दुपारी 3 वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून अर्ज पारंपरिक ऑफलाईन पद्धतीने 2 डिसेंबर 2022 रोजी (उद्यापर्यंत) सायंकाळी 5.30 पर्यंत सादर करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी दिली आहे.

राज्यातील 7751 गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर 20 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. निकाल जाहीर होईपर्यंत 7751 गावांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com