NCP Mahila association
NCP Mahila association Pramod Ingale, satara
पश्चिम महाराष्ट्र

महागाईवरून राष्ट्रवादीच्या महिला आक्रमक : मोदी सरकारचा नोंदविला निषेध

Umesh Bambare-Patil

सातारा : मोदी सरकार हाय हाय.., राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो.., केंद्रातील बीजेपी सरकारचे करायचे काय...खाली डोकं वर पाय...अशी घोषणाबाजी करत राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने आज जीवनावश्यक वस्तू व घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीच्या निषेधार्थ केंद्रातील मोदी सरकारचा निषेध नोंदविला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमून महिलांनी गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घेण्याची मागणी करत आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला आघाडीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. निषेधाचे फलक हातात घेऊन महिलांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष समींद्रा जाधव, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा कविता म्हेत्रे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस संगीता साळुंखे, पक्ष निरिक्षक वैशालीताई दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.

यावेळी महिलांनी मोदी सरकार हाय हाय.., राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो.., केंद्रातील बीजेपी सरकारचे करायचे काय...खाली डोकं वर पाय...,देश की जनता रोती है..मोदी सरकार सोती है... मोदी सरकार हाय हाय... राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो...अशी घोषणाबाजी केली. यावेळी कविता म्हेत्रे म्हणाल्या, मोदी सरकारे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढविले असून इंधनाचे दर वाढविले आहे. भाजप सरकारने महिलांच्या तोंडचा घास काढला आहे. अशा या सरकारला महिला खाली खेचल्या शिवाय राहणार नाहीत.

वैशाली दाभाडे म्हणाल्या, गॅस दर वाढीच्या निषेधार्थ सर्व महिला आंदोलन करत असून मोदींनी सत्तेत येण्यापूर्वी अनेक आश्वासने दिली होती. त्यांनी आश्वासने पाळलेली नाहीत. खोटे बोला पण रेटून बोला या तत्वावर चालणारे हे भाजपचे सरकार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वारंवार वाढ होत आहे. त्यामुळे महिलांचे बजेट कोलपडले आहे. याचा आम्ही सर्व महिला याचा निषेध करतो.

संगीता साळुंखे म्हणाल्या, कित्येक दिवस आम्ही आंदोलन करतोय, ते मोदी सरकारला दिसत नाही. स्मृती इराणींना महिलांचा आक्रोश दिसत नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या आंदोलनात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या सिमा जाधव, संजना जगदाळे, नलिनी जाधव, कुसुमताई भोसले, रूपाली भिसे, अनघा कारखानिस, सुनीता शिंदे, वैशाली सुतार, मंगल जगदाळे, रूक्मिणी वाघ, सुवर्णा भोसले, बेबी बुधावले, मोना तांबे, उषा जगदाळे, हेमलता निंबाळकर आदी सहभागी झाल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT