NEET Paper Leak Case sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटीचे पुणे कनेक्शन उघड! बिबवेवाडीतून ब्युटी पार्लर चालक महिला ताब्यात

NEET-UG examination 2026 One Suspect Arrested From Pune : नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नाशिकनंतर आता पुण्यात देखील समोर आले असून पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

Sudesh Mitkar

  1. नीट पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांनी बिबवेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतले आहे.

  2. संशयित आरोपी धनंजय लोखंडे याला मदत केल्याचा आरोप संबंधित महिलेवर करण्यात आला आहे.

  3. या कारवाईनंतर नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे अधिक खोलवर गेल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Pune News : नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता विद्येच्या माहेरघरातूनही समोर येऊ लागले असून पुणे पोलिसांनी आज पहाटे मोठी कारवाई केली आहे. नीट पेपर प्रकरणातील संशयित आरोपी धनंजय लोखंडे याला मदत केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बिबवेवाडी परिसरातून ब्युटी पार्लर चालक मनीषा वाघमारे या महिलेला ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून या प्रकरणाचे धागेदोरे आता खोलवर गेल्याचे स्पष्ट होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेली मनीषा वाघमारे ही महिला पुण्यात ब्युटी पार्लर चालवते. मात्र, ब्युटी पार्लरच्या व्यवसायाच्या आडून ती या रॅकेटमध्ये सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय आहे. अहिल्यानगरमधून अटक करण्यात आलेल्या धनंजय लोखंडे याच्या संपर्कात ती होती.

धक्कादायक बाब म्हणजे, पेपर मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम मनीषा वाघमारे करत असल्याचे तपासातून समोर आले आहे. एक प्रकारे एजंट म्हणून ती या साखळीत काम करत असल्याचा संशय बळावला आहे.

पुणे पोलिसांनी आज पहाटे बिबवेवाडी परिसरात सापळा रचून ही कारवाई केली. यावेळी तिच्याकडून एक मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे यांच्यातील अनेक व्हॉट्सअ‍ॅप कॉल्स आणि मेसेजेस पोलिसांच्या हाती लागले असून, त्यातून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईनंतर आता मनीषा वाघमारे हिला आज सायंकाळपर्यंत सीबीआयच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे समजते. आता सीबीआयच्या तपासात या प्रकरणाचे पुण्यातील आणखी कोणाकोणाशी कनेक्शन आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

FAQs :

1. पुणे पोलिसांनी कोणाला ताब्यात घेतले?

बिबवेवाडी परिसरातील ब्युटी पार्लर चालक मनीषा वाघमारे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

2. त्यांच्यावर कोणता आरोप आहे?

नीट पेपरफुटी प्रकरणातील संशयित आरोपी धनंजय लोखंडे याला मदत केल्याचा आरोप आहे.

3. ही कारवाई कोणी केली?

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

4. ही घटना कोणत्या प्रकरणाशी संबंधित आहे?

ही घटना नीट पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित आहे.

5. या प्रकरणामुळे काय चर्चा सुरू झाली आहे?

शिक्षण क्षेत्रातील गैरप्रकार आणि पेपरफुटी प्रकरणाचे मोठे जाळे असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT