Dhananjay Mahadik, Satej Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul News: गोकुळ दूध संघात पुन्हा नवा ट्विस्ट! महायुतीचे संचालक 'समविचारी'च्या संचालकांविरोधात दाखल करणार यचिका

Gokul News: न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल करणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे.

Amit Ujagare

Gokul News: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ मर्यादित अर्थात गोकुळमध्ये पुन्हा नवा ट्विस्ट आला आहे. महायुतीचे संचालक आता आघाडीच्या संचलकांविरोधात कोर्टात धाव घेऊन याचिका दाखल करणार आहेत. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल करणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे.

नेमकं कारण काय?

धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषद घेऊन यांसदर्भात माहिती दिली आहे. यात त्यांनी सांगितलं की, निवडणुकीनंतर अध्यक्ष निवडीसाठी बोलावलेल्या २ नोव्हेंबरच्या संचालकांच्या बैठकीला समविचारी आघाडीचे १३ संचालक उपस्थित राहिले तर महायुतीचे १२ गैरहजर राहिले. कोरम अभावी पहिली सभा तहकूब झाली, त्याविरोधात काँग्रेस नेते सतेज पाटील हे कोर्टात गेले होते.

नोटीसा दिल्याच नाहीत

कोर्टाकडून १२ संचालकांना नोटीस देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. समविचारी आघाडीच्या वकिलांना नोटीस दिल्या आहेत का? अशा विचारणा न्यायल्याने केली. यावर समविचारी आघाडीच्या वकिलांकडून विरोधातील सर्वांना नोटीस दिल्याचा कोर्टात दावा केला. पण आमच्या १२ पैकी ३ संचालकांना नोटीसच देण्यात आली नव्हती. यामध्ये वीरेंद्र मंडलिक, अंबरीश घाटगे आणि करणसिंह गायकवाड यांना नोटीस देण्यात आली नाही.

कोर्टात याचिका दाखल करणार

सोमवारी हे तिन्ही लोक कोर्टात उपस्थित राहणार आहेत. सतेज पाटील हे खोट बोलतात, आता ते कोर्टात खोटं बोलले आहेत. त्यामुळं आता कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी आम्ही त्यांच्याविरोधात आमचे हे तिघे संचालक कोर्टात जाऊन समविचारीच्या संचालकांविरोधात कोर्टाची अवमान याचिका दाखल करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT