Solapur, 11 July : खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माळशिरस पंचायत समितीच्या उपअभियंत्यास शिवीगाळ करत हातपाय तोडण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. मात्र, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित अधिकाऱ्याला मारहाण झाल्याचा दावा केला आहे. दार लावून त्या अधिकाऱ्याला मारहाण झाली आहे, असे ही त्यांनी म्हटले आहे, त्यामुळे मोहिते पाटलांच्या ऑडिओ क्लिपमधील धमकी प्रकरणाला वेगळे लागले आहे.
सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांना माळशिरस तालुक्यातील अधिकाऱ्याला मोहिते पाटील यांच्याकडून दिलेल्या धमकी प्रकरणावर प्रश्न विचारण्यात आला होता. त्या वेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला मारहाण झाल्याचा दावा केला आहे.
ते म्हणाले, माळशिरस तालुक्यातील धमकीचा विषय फार गंभीर आहे. पंचायत समितीच्या त्या अधिकाऱ्याला मारहाण झाली आहे, दार लावून त्या अधिकाऱ्याला मारहाण झाली आहे.
अधिकाऱ्याला धमकी दिल्याची क्लिप सर्वांनी ऐकली आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. यात जे कोणी दोषी आहेत, त्यांच्यावर पोलिस कारवाई करतील. पण सोलापूर जिल्ह्यात कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. जिल्ह्यात अधिकाऱ्यांवर हुकूमशाही, धमकी चालणार नाही, असेही गोरे यांनी निक्षून सांगितले.
ते म्हणाले, अधिकाऱ्यांनी काम केलेच पाहिजे. त्यांना कामापासून पळ काढता येणार नाही. पण, काम करत असताना अधिकाऱ्यांवर दडपशाही किंवा गुंडगिरी करून कोणी काम करायचा प्रयत्न करत असेल, तर कुठलीही गुंडगिरी या जिल्ह्यात चालू देणार नाही.
सोलापूरचे शेतकरी कर्नाटकात जाण्याची मागणी करत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे आमची जबाबदारी आहे. सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांना आम्ही मदत करतोय. सध्या अल निनोचे संकट आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. त्या शेतकऱ्यांना विनंती आहे की, प्रत्येकवेळी अशी भूमिका घेऊ नये, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.
बिनकामाच्या डोक्यातून आलेल्या गोष्टींवर चर्चा योग्य नाही
संजय राऊत यांना आता काम राहिलेले नाही. बिनकामाच्या डोक्यातून आलेल्या गोष्टींवर चर्चा करणे योग्य नाही. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रगतिपथावर काम सुरू आहे. उर्वरित 3 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून काम करतील. फडणवीस हे देशातील सर्वात मजबूत आणि कर्तृत्ववान मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. बिना काडीपेटी घेता आग लावता येते, का ते पाहून काही लोक आग लावत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.