Nilesh Lanke, Rahul Zaware Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nilesh Lanke : धनगर समाजाला नीलेश लंकेंनी दिला शब्द : आरक्षणासाठी विधीमंडळात उठविणार आवाज

धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी पुढाकार घेण्याचे ठरविले आहे.

सरकारनामा ब्युरो

Nilesh Lanke : अहमदनगर - धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सातत्याने कष्ट करणाऱ्या या समाजाला आरक्षणाचा लाभ मिळालाच पाहिजे. या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी पुढाकार घेण्याची ठरविले आहे. धनगर आरक्षणासाठी विधीमंडळात आवाज उठविणार असल्याचे आमदार लंके यांनी सांगितले.

पारनेर तालुक्यातील वनकुटे शिवारातील तांबेवाडा, गोरेवाडा, गाडीवाडा येथील धनगर बांधवांतर्फे आमदार नीलेश लंके यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार लंके हे बोलत होते. यावेळी वनकुटयाचे लोकनियुक्त सरपंच अ‍ॅड. राहुल झावरे, उपसरपंच अर्जुन कुलकर्णी, पळशीचे उपसरपंच अप्पासाहेब शिंदे, चेअरमन शिवाजी बरकड, सुरेश नागरे, कारभारी मुसळे, बाळासाहेब बर्डे, शरद गोयेकर, भाऊसाहेब वालझाडे, बबन मुसळे, रामा साळवे, टायगर शेख, टाकळी ढाकेश्‍वरचे उपसरपंच किरण तराळ आदी उपस्थित होते.

आमदार नीलेश लंके म्हणाले, विधानसभा निवडणुकीमध्ये धनगर समाज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. मतमोजणी सुरू झाली त्याच वेळी मला आघाडी मिळाली. सुरवातच धनगर बांधवांच्या आघाडीने झाल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, या बांधवांना मला भरभरून प्रेम दिले असून ते मी कधीही विसरणार नाही. त्यांच्या आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागला पाहिजे यासाठी आपण आग्रही आहोत. या बांधवांसाठीच्या विविध योजनाही या भागात राबविण्यात येणार आहेत. विकासापासून वंचित असलेल्या या समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे आहे. सात ते आठ महिने भटकंती करणाऱ्या या समाजाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडले पाहिजे. हा समाज बाहेर भटकंती करीत असताना अनेकदा अडचणी येतात. महाराष्ट्रात कोठेही अडचण आली तर ती दूर करण्याचा मी आजवर प्रयत्न केला आहे. यापुढील काळातही कधीही फोन करा तुमचा भाऊ तुमच्यासाठी सदैव उपलब्ध असेल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

लवकरच राज्यस्तरीय घोडे स्पर्धा

धनगर बांधवांच्या आवडीच्या घोड्यांच्या स्पर्धेचे लवकरच आयोजन करण्यात येणार असल्याचे आमदार लंके यांनी यावेळी जाहीर केले. या स्पर्धेमध्ये राज्यस्तरावरील स्पर्धकांना सहभागी करून घेण्यात येणार असून तालुक्यात प्रथमच अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. राहुल झावरे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT