नीलेश लंके म्हणाले, मी पाकिस्तानातून आलोय का ?

आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी एका कार्यक्रमात आज माजी आमदार विजय औटी ( Vijay Auti ) यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली.
MLA Nilesh Lanke
MLA Nilesh LankeSarkarnama
Published on
Updated on

पारनेर ( अहमदनगर ) : अहमदनगर जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यात पारनेर नगरपंचायतचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP )शिवसेनेत ( Shivsena ) आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी एका कार्यक्रमात आज माजी आमदार विजय औटी ( Vijay Auti ) यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. Nilesh Lanke said, am I from Pakistan?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित व्हर्च्युअल रॅलीनंतर आमदार लंके यांनी आज (रविवारी) उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी पारनेरचे माजी सरपंच राजेंद्र तारडे तसेच इतरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, अशोक कटारिया, बाबाजी तरटे, गंगाराम बेलकर, सुदाम पवार, विक्रमसिंह कळमकर, अशोक घुले, अॅड. राहुल झावरे, डॉ.मुद्दसर सय्यद, डॉ. बाळासाहेब कावरे, विजय डोळ, अशोक कावरे, कारभारी पोटघन, सुवर्णा धागडे, उमा बोरूडे, राजेश्‍वरी कोठावळे आदी उपस्थित होते.

MLA Nilesh Lanke
आमदार नीलेश लंके यांची विजय औटींना एकाकी पाडण्याची खेळी

आमदार नीलेश लंके म्हणाले, पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीत भावनिक आवाहन करण्यास सुरूवात झाली आहे. परकीय आक्रमण थोपवा असे सांगितले जाऊ लागले आहे. मी स्वतः फोन रेकॉर्डींग ऐकले आहे. मी पारनेर - नगर मतदारसंघाचा आमदार आहे. पारनेर शहरातील मतदारांनीही मला मतदान केले आहे. शहराच्या विकासासाठी आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत. मला परकीय म्हणता, मी पाकिस्तानातून आलोय का ? मी दुसऱ्या तालुक्यातील आमदार आहे का? मी होतो त्यामुळेच मागच्या वेळी नगरपंचायतीची सत्ता आली. माझ्यामुळेच थोडीफार तरी वाचली नाही, तर ती देखील गेली असती ! अशी टीका आमदार लंके यांनी केली.

MLA Nilesh Lanke
आमदार नीलेश लंके व विजय औटी यांची प्रतिष्ठेची लढाई

आमदार लंके म्हणाले, पारनेकारांनी नगरपंचायतीच्या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात देऊन पवार साहेबांना वाढदिवसाची भेट द्यावी, असे आवाहन आमदार लंके यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com