राजेंद्र त्रिमुखे :
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत - जामखेड विधानसभा मतदार संघासाठी कर्जत येथे पाटेगाव-खंडाळा येथे होणाऱ्या एमआयडीसीचा प्रश्न सध्या चर्चेत केंद्रस्थानी आहे. सध्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज सुरू असून, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) तर भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी एकमेकांवर आरोपांच्या केल्याने हा मुद्दा चर्चेत आला आहे.
आमदार शिंदे यांनी विधानपरिषदेत बोलताना कर्जत येथील एमआयडीसी होणाऱ्या ठिकाणची जमिनी नीरव मोदीची आहे का? याची चौकशी व्हावी अशी मागणी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कर्जत येथे होणाऱ्या एमआयडीसीचा विषय मी अनेकदा याआधीही मांडलेला आहे. त्यामुळे मतदारसंघातील शेतकरी आणि युवकांना रोजगार मिळावा अशीच माझी पहिल्यापासूनची भूमिका असून, लवकरात लवकर एमआयडीसीची अधिसूचना निघावी. मात्र तत्पूर्वी या एमआयडीसीसाठीची जमीन कोणा नीरव मोदी नावाच्या व्यक्तीची आहे का? त्याचबरोबर या एमआयडीसीसाठी गुंतवणूकदार जिंदाल आणि अदानी यांच्यासोबत काही चर्चा झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला.
सभागृहात या प्रश्नांवर उत्तर देताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सरकारचा कर्जत एमआयडीसीला कसलाही विरोध नसून, सहमती असल्याचे सांगितले. मात्र एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांची सलग जमीनी मिळायला हवीत, नीरव मोदी कोण? अमेरिकेत गेलेला की इतर कोणी याची चौकशी करू, तसेच इतर तांत्रिक मुद्द्यांमध्ये इकोझोन, जलसंपदा विभागाची पाण्याची व्यवस्था आदी पायाभूत सुविधांबाबत तांत्रिक अहवाल येणे गरजेचे आहे.
सरकारचा कर्जत एमआयडीसीला विरोध नसून अनुकूलताच आहे. मात्र यातील सर्व तांत्रिक बाबी तपासून त्याचबरोबर या ठिकाणची जमीन कोणा नीरव मोदीच्या नावाने आहे का? याबाबतही माहिती घेऊन त्यानंतरच येथील एमआयडीसीला परवानगीची अधिसूचना काढली जाईल, असं आश्वासन सामंत यांनी दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.