Uddhav Thackeray Shiv Sena Chief : उद्धव ठाकरे पुन्हा पक्षप्रमुख होणार; हजारो शिवसैनिकांसमोर होणार फेरनिवड!

Uddhav Thackeray to become Shiv Sena party chief : आदित्य ठाकरे यांचेही नेतेपदी निवड होणार..
Uddhav Thackeray Shiv Sena Chief :
Uddhav Thackeray Shiv Sena Chief : Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाचं आज रविवार(दि.१८ जून) वरळीत मेळावा होत आहे. पक्षाच्या वर्धापन दिनाच्या एक दिवस आधी राज्यव्यापी शिबिर वरळीत पार पडत आहे. या मेळाव्यात नव्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) पुन्हा पक्षप्रमुखपदावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त पक्षातील नेत्यांच्या फेरनियुक्त्या केल्या जाणार आहेत. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray Shiv Sena Chief :
Rohit Pawar Love Story : "आयुष्य बेटर करणारी My Better Half" ; रोहित पवार आणि कुंती पवारांची लग्नाची गोष्ट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेचे दोन गट झाले. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह हे शिंदेंच्या गटाला बहाल केले. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मशाला चिन्हं दिल. २०१८ मध्ये उद्धव ठाकरे यांची पुढील पाच वर्षांसाठी निवड झाली. ही मुदत आता संपली आहे. यामुळे आता पुन्हा नियुक्ती करण्यात येणार आहे.

आज १८ जून रोजी वरळी येथे शिवसेनेचा मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातील शिवसैनिक येणार आहेत. याच मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदावर फेरनिवड करण्यात येत आहे. तसेच युवा सेना नेते आदित्य ठाकरे आणि इतरही नेत्यांची निवड करण्यात येणार आहे. तसेच, पक्षाच्या इतरही नियुक्त्या होण्याची शक्यता आहे. याशिवाय काही महत्त्वपूर्ण ठराव करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Uddhav Thackeray Shiv Sena Chief :
Aditya Thackeray On Eknath Shinde : 'शिंदे गटाने 'जागतिक गद्दार दिन' साजरा करावा' ; आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं!

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाची सूत्रे शिंदेकडे बहाल केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून कायदेशीर बाबींची चाचपणी करून सावध पावले टाकण्यात येत आहेत. ठाकरे गटाने बचावात्मक भूमिका घेतला आहे. पक्ष चिन्ह एकनाथ शिंदेंना बहाल केल्यावर याला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे. हा वाद अद्यापही न्यायालयात प्रलंबित आहे. याच अनुषंगाने उद्धव ठाकरे गटाने या नियुक्तिच्या माध्यमातून शिंदे गटाला इशारा देण्याचा हा प्रयत्न आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com