Nitesh Rane- Manoj Jarange Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nitesh Rane : "राणेसाहेब आणि फडणवीसांवर जीभ वळवळली, तर जीभ ठेवायची का नाही हे ठरवू", नितेश राणेंचा जरांगे-पाटलांना इशारा

Akshay Sabale

Nitesh Rane Vs Manoj Jarange Patil : मनोज जरांगे-पाटील याने नारायण राणे यांच्यावर बोलताना दोनवेळा विचार करावा. त्यानं जास्त जीभ वळवळू नये. पुन्हा नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जीभ वळवळली, तर जीभ जागेवर ठेवायची की नाही, हे आम्ही ठरवू, असा एकेरी उल्लेख आमदार नितेश राणे यांनी जरांगे-पाटलांना इशारा दिला आहे. ते करमाळ्यात एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

"मी गणेशोत्सव झाल्यानंतर मराठवाड्यात जाणार आहे. बघू तर जरांगे-पाटील काय करतो," असा इशारा खासदार नारायण राणे ( Narayan Rane ) यांनी इशारा दिला होता. यानंतर जरांगे-पाटील यांनी नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिलं होते. "अशा फुकट धमक्या नाही द्यायच्या. धमक्यांना मी घाबरत नाही. मी जर म्हणालो मराठवाड्यात येऊ देऊ नका, तर कोकणात सुद्धा तुम्हाला फिरून देणार नाहीत. मी लक्ष घातले, तर खूप फजिती होईल," असं जरांगे-पाटील म्हणाले होते. यावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत जरांगे-पाटलांवर निशाणा साधला आहे.

"राणेसाहेबांवर बोलताना विचार करा"

नितेश राणे ( Nitesh Rane ) म्हणाले, "जरांगे-पाटील यानं नारायण यांच्यावर बोलताना दोनवेळा विचार करावा. त्याने काय एकट्यानं मराठ्यांचा ठेका घेतला नाही. आम्हीपण 96 कुळी मराठे आहोत. आम्हीही मराठा आरक्षणासाठी केसेस अंगावर घेतल्या आहेत. स्वत: नारायण राणे यांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं आहे."

"...तर आम्हालाही उत्तर द्यायला चांगलं जमते"

"जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) यानं जास्त जीभ वळवळू नये. नारायण राणे यांच्यावर बोलण्याची हिंमत करशील, तर आम्हालाही उत्तर द्यायला चांगलं जमते. तू एकटाच मराठा नाही. तू कुणालाही शिव्या घालतो, कुणावरही टीका करतो. पहिल्यांदा पाठीमागील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि गळ्यातील भगवा गमछा बाजूला कर मग टीका-टिप्पणी कर. पुन्हा नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जीभ वळवळली, तर जीभ जागेवर ठेवायची का नाही, हे आम्ही ठरवू," असं नितेश राणे राणे यांनी ठणकावून सांगितलं.

"जरांगे-पाटील याने तुतारी वाजवत राज्यात फिरावे"

"जरांगे-पाटील भाजपच्या नेत्यांना जाब विचारतो. कधी शरद पवारसाहेब, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंना मराठा आरक्षणाबाबत जाब विचारला नाही. यापेक्षा जरांगे-पाटील याने तुतारी वाजवत राज्यात फिरावे. कारण, तू तुतारीचा माणूस आहे, हे जगाला कळलं आहे. रात्री तुतारी वाजवायची आणि सकाळी उठून भाजपवर टीका करायची, हा तमाशा महाराष्ट्रात जास्तवेळ चालणार नाही," अशी हल्लाबोल नितेश राणे यांनी जरांगे-पाटलांवर केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT