Uddhav Thackeray nitin Bangude Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nitin Bangude Patil : बानगुडे पाटील यांना बढती की डच्चू? जिल्हासंपर्कपदी आता गोरेंची नियुक्ती!

Nitin Bangude Patil : पक्षाची अपेक्षित कामगिरी होऊ शकली नाही.

सरकारनामा ब्यूरो

Satara News: शिवसेनेतल्या फुटीनंतर ठाकरे गटाला गळती लागली. शिवसेनेचे १२ खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. अजून देखील शिवसेनेतील नेते शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत. स्थानिक पातळीवरही याचे पडसाद उमटत आहेत. याचाच परिणाम म्हणून साताऱ्यात ठाकरे गटाने सातारा जिल्हा संपर्क प्रमुखपदी आता शेखर गोरे (SheKhar Gore) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मागील अनेक वर्षांपासून सातारा जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून प्रा.नितीन बानगुडे पाटील यांच्यावर जवाबदारी होती. परंतु या काळात या ठिकाणी पक्षाची अपेक्षित कामगिरी होऊ शकली नाही. या उलट पक्षांतर्गत कारवायांमुळे जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला व शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता बाणगु़डे पाटील यांची बढती केली की त्यांना जिल्हासंपर्क पदावरून डच्चू देण्यासाठी हे बढतीचे कारण पुढे केले गेले, अशी चर्चा आहे.

आता यावर उपाय म्हणून आता ठाकरे गटाने आता जिल्हा संपर्क प्रमुखपदी जिल्ह्यातील नेते शेखर गोरे यांची निवड केली आहे. गोरे हे युवकांचे मोठे संघटन असणारे माण खटावातील नेतृत्व आहे. नितीन बानुगडे पाटील यांना पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख म्हणून जवाबदारी दिली आहे.शेखर गोरे यांच्याकडे युवकांचे मोठे संघटन आहे. ते ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत,पंचायत समिती :

शेखर गोरे यांची जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर सुद्धा मोठी पकड आहे. मागे झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत निर्णायक विजय मिळवत, त्यांनी जिल्ह्यातील राजकीय प्रस्थ दाखवून दिले होते. जिल्ह्यातील शिवसेना संघटन वाढवण्यासाठी आता खुद्द ठाकरेंनीच शेखर गोरे यांची निवड केल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातच, तसेच भाजप, राष्ट्रवादी चे मोठ्या प्रमाणात असलेल्या वर्चस्वाला आता गोरेकडून आव्हान मिळणार आहे. पण आता खरंच गोरेंच्या नियुक्तीमुळे शिवसेनेची स्थिती सुधारते का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT