मुंबई : महाराष्ट्र (Maharashtra)-कर्नाटक (Karnataka) सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर वेगवान घडामोडी घडत आहेत. जतचे काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत (Vikramsinh Sawant) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेऊन तालुक्याच्या समस्या त्यांच्या कानावर घातल्या आहेत. पुढच्या आठवड्यातील कॅबिनेट बैठकीत जतसंदर्भात (Jat) मुख्यमंत्री शिंदे मोठा निर्णय घेणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (A big decision will be made in the next cabinet regarding Jat Taluka ; MLA Sawant meet Shinde)
जत तालुक्यातील काही गावांनी काही वर्षांपूर्वी कर्नाटक जाऊ, असा इशारा पायाभूत समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारला दिला हेाता. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या गावांबाबत भाष्य केले हेाते. त्याची तीव्र प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटली हेाती. त्यानंतर महाराष्ट्र सरकार आणि राजकीय नेत्यांनी तातडीने हालचाली करत जतचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचा एक भाग म्हणून आमदार सावंत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
सीमा प्रश्नावर पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री महत्वाची बैठक घेणार आहेत. त्या बैठकीत मोठा निर्णय होणार आहे. पुढच्या कॅबिनेटच्या आधी ही बैठक होणार आहे. जतचे काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या बैठकीत जत तालुक्यातील प्रश्नांवर चर्चा झाली असून, जत तालुक्यावर अन्याय होणार नाही, लवकरच याबाबत तोडगा काढू, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे, असे या वेळी आमदार सावंत यांनी सांगितले.
दरम्यान, पुढील आठवड्यात होणाऱ्या कॅबिनेट बैठकीच्या अगोदर जत तालुक्याच्या प्रश्नावर उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला देखील आमदार विक्रमसिंह सावंत हजर राहणार आहेत. याच बैठकीत जत तालुक्याच्या संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या मुळे या बैठकीकडे जत तालुक्याचे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.