Shashikant Shinde-Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : शशिकांत शिंदेंच्या शिलेदारांना फोडण्यासाठी नितीन पाटलांची फिल्डिंग; अजितदादा-मकरंद पाटील पुरवणार रसद

Nitin Patil : यांनी कोरेगावमधील सभासद नोंदणीचा कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील व मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून तुम्हाला शक्ती देईन, असे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले.

Hrishikesh Nalagune

NCP News : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या सोयीच्या भूमिका घेतल्या. अजूनही काही कार्यकर्ते शरद पवार आणि अजित पवार गटात आहेत. पण आता कार्यकर्त्यांनी राजकीय भूमिका घ्यावी. उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील व मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून तुम्हाला शक्ती देईन, असे म्हणत खासदार नितीन पाटील यांनी कोरेगावमधील सभासद नोंदणीचा कार्यक्रमाचा शुभारंभ केला.

खासदार पाटील म्हणाले, "केवळ तत्त्वे, विचारावर कोणतीही संघटना चालत नाही व वाढत नाही. त्या जोडीला विकासकामांची जोड हवी असते. हे लक्षात घेऊन आपले नेते अजित पवार यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आपण महायुतीमध्ये आहोत. म्हणूनच आपण किसन वीर सातारा, खंडाळ्यासह तीन कारखाने वाचवू शकलो. या कारखान्यांच्या सुमारे 80 हजार सभासदांना चांगला दिलासा देऊ शकलो. महायुतीमुळे आपल्याला 467 कोटी रुपयांची मदत झाली, असेही सांगितले.

मात्र या सगळ्याच्या माध्यमातून खासदार पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्यासाठी मोहीम सुरू केल्याची जोरदार चर्चा आहे. सातारा जिल्हा हा पूर्वीपासून शरद पवार यांना मानणारा जिल्हा राहिला आहे. कराड लोकसभा मतदारसंघ असताना कराड आणि सातारा या दोन्ही मतदारसंघांतील खासदार, जिल्ह्यातील सर्वाधिक आमदार राष्ट्रवादीचे असायचे.

आता राष्ट्रवादीतील फुटीनंतर अनेक कार्यकर्ते नेमके कोणासोबत जायचे या द्विधा मनस्थितीमध्ये असल्याचे उघड आहे. त्यातून जिल्ह्यात दोन्हीही राष्ट्रवादीचे केवळ दोन आमदार निवडून येऊ शकले. कोरेगावमध्ये शशिकांत शिंदे यांचा, कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील यांचा तर माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा पराभव झाला. अशात सत्तेच्या माध्यमातून ताकद देण्याचे आश्वासन देत पाटील यांनी द्विधा मनस्थिती असलेल्या कार्यकर्त्यांसाठी गळ टाकला आहे.

सोबतच सभासद नोंदणी सुरु करत कार्यकर्त्यांना पक्षात येण्यासाठीचे दारही उघडून दिले आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मोहिमेकडे बघितले जात आहे. आता पाटील यांच्या या आवाहनाला किती कार्यकर्ते प्रतिसाद देणार, किती कार्यकर्ते शरद पवार आणि शशिकांत शिंदे यांची साथ सोडणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT