Minister Nitin Raut
Minister Nitin Raut Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

भाषण करताना नितीन राऊतांच्या अश्रूंचा बांध फुटला

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - राज्यातील ऊर्जा कंपन्यांच्या खासगीकरणावर चर्चा होत आहे. विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे 20 व्या द्विवार्षिक महाअधिवेशन आज (मंगळवारी) शिर्डीत झाले. या महाअधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केले. या प्रसंगी बोलताना मंत्री नितीन राऊत यांनी विद्युत कर्मचाऱ्यांची व्यथा मांडली. भाषणात आपल्या कुटुंबाची व्यथा मांडताना मंत्री नितीन राऊत ( Nitin Raut ) यांच्या डोळ्यांत न कळत अश्रू आले. ( Nitin Raut burst into tears during the speech )

मंत्री नितीन राऊत यांनी भाषणातून विद्युत कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडल्या. विद्युत कंपन्यांचे खासगीकरण होणार नसल्यांचे त्यांनी स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडत असतानाच त्यांनी आपल्या कुटुंबाशीही तुलना केली. कर्तव्य बजावताना होणारी कौटुंबिक ओढातान सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. भावूक झालेले मंत्री पाहून उपस्थितांनाही त्यांच्यातील माणूसकीचे दर्शन घडले. स्वतःला सावरत मंत्री नितीन राऊत म्हणाले की, कामगारांनी माझ्याकडे मागण्या केल्या आहे, मी तुमचा कुटुंब प्रमुख न्याय देण्याचे काम करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले. गरिबीचे चटके काय असतात याची मला कल्पना आहे, असे सांगताना त्यांनी बालपणीच्या खडतर आठवणी सांगितल्या. “गिरणी कामगार असलेल्या वडिलांच्या पायाला पकडून जेव्हा मी सायकल घेऊन मागितली तेव्हा ते मला 300 मीटर तसेच फरफटत पुढे घेऊन गेले. बेटा माझ्याकडे तुला सायकल घेऊन देण्यासाठी पैसे नाहीत,” हे सांगताना राऊत यांच्या डोळ्यात पाणी तरळले.

नितीन राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, केंद्राने आणलेला ठराव काय म्हणतो. त्या बिलामध्ये काय माहिती आहे. केंद्र जर खासगीकरणाकडे जात नसेल तर कालच दादरा नगरहवेलीमध्ये प्रधानमंत्र्यांनी तेथील वीज वितरण प्रणाली आदानी व टोरेंट कंपनीला दिली असेल तर मग काय खासगीकरण नाहीतर सरकारीकरण आहे काय. त्यांनीच सांगाव 2014मध्ये आम्ही 14 हजार कोटी थकबाकी असताना तुमच्या 5 वर्षांच्या कार्यकाळात ती 51 हजार कोटीच्या वर गेली. त्याला कोण कारणीभूत आहे. ज्यावेळी कोऱ्हाडी थर्मल पावर स्टेशन पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांना म्हंटल, तुमच्या मंत्र्यांकडे व संचालकांकडे बोट दाखवत सांगितले होते की यांच्याकडे जरा लक्ष ठेवा. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर निश्चित लक्ष ठेवले असेल म्हणून त्यांना विधानसभेचे तिकीट मिळाले नव्हते, असा टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना लगावला.

उन्हाचा परिणाम जसा माणसांवर होतो तसा विद्युत यंत्र सामुग्रीवरही होतो. सबस्टेशनवरील ट्रान्स्फार्मरला आम्ही आजू बाजूने कुलर लावतो. त्याला थंडवारा देतो जेणे करून ते ट्रिप होऊ नयेत. परंतु उष्णता अशी आहे की आपला नाईलाज असतो. कुठेही भारनियमन होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेत आहोत. कारण हा महिना पवित्र महिना आहे. रमजान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, राम नवमी याच महिन्यात आहे. त्यामुळे या महिन्यात भारनियमन कोठेही होणार नाही. याची काळजी आम्ही घेत आहोत. त्यासाठी आम्ही मुंबईत तसेच प्रत्येक क्षेत्रीय व जिल्हा कार्यालयातही कंट्रोल रूम सुरू केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT