Anna Hazare News Updates Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'अण्णांचे उपोषण स्थगित'; सरकारची धावपळ अन् ग्रामस्थांचा आग्रह अखेर यशस्वी

Anna Hajare | Wine | : अण्णा हजारेंनी उपोषण मागे घ्यावे यासाठी सरकार आणि प्रशासन सर्वांनीच देव पाण्यात ठेवले होते...

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांचे वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधातील उपोषण पुढच्या ३ महिन्यांसाठी स्थगित करण्यात आल्याचे राळेगणसिद्धीचे माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य डॉ. धनंजय पोटे यांनी 'सरकारनामाशी' बोलताना सांगितले. अण्णा हजारे यांनी उपोषण स्थगित करावे यासाठी ग्रामसभेत एकमुखाने ठराव मंजूर करण्यात आला. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर यांनीही अण्णांची यशस्वी समजूत काढली आहे.

ठाकरे सरकारने (Thackeray Government) काही दिवसांपूर्वी सुपरमार्केटमध्ये वाईन (Wine) विक्रीला परवानगी दिली आहे. मात्र या निर्णयाला राज्यभरातील लोकांसह, भाजप आणि इतर सामाजिक-राजकीय संघटनांनी त्याला विरोध केला आहे. अण्णा हजारे ( Anna Hazare ) यांनीही हा निर्णय मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. तसेच हा निर्णय मागे न घेतल्यास त्यांनी १४ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण (Indefinite Hunger Strike) करण्याचा इशाराही दिला होता.

मात्र अण्णांची वय आणि तब्येत बघता त्यांनी उपोषणापासून माघार यासाठी त्यांची समजूत काढण्याची जबाबदारी सरकारने राज्य उत्पादन शुल्कच्या प्रधान सचिव वल्सा नायर यांच्यावर सोपवली होती. नायर यांनी काल अण्णा हजारेंची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. हा निर्णय आम्ही लोकांसमोर ठेवू आणि मगच पुढचे धोरण ठरवू असा विश्वास त्यांनी अण्णांना दिला. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आपले ५० टक्के समाधान झाल्याचे ही अण्णांनी म्हटले होते.

त्यानंतर आज अण्णा हजारे यांनी उपोषण करावे की नाही यासाठी राळेगणसिद्धी येथे एका विशेष ग्रामसभेच आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्री करावी की नाही? अण्णा हजारे यांनी उपोषणाला बसावे की नाही? याबाबत ठराव मांडले. यात ग्रामस्थांनी एकमुखाने हात उंचावून दोन्ही ठराव मंजूर केले आणि सरकारने घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि अण्णा हजारे यांनी उपोषण करू नये असा निर्णय घेण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT