Kolhapur, 28 December : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगला आहे. महायुतीमध्येही अंतर्गत खटके उडायला सुरुवात झाली आहे. भाजपचे नेते आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. भाजपचे प्रवीण दरेकर यांनही धस यांची पाठराखण केली. मात्र, आता मंत्री धनंजय मुंडेंचीही पाठराखण राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
राज्यात संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचा प्रश्न चिघळत असताना मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. त्यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची आवश्यकता नाही, असे विधान केले आहे. मुश्रीफ म्हणाले, सुरेश धस यांनी आरोप केले, त्यावेळी मी विधानसभेत उपस्थित होतो. त्याला धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलेले आहे. भाजप टार्गेट करत आहे, असं काहीही नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चौकशी करतील.
फडणवीस हे कार्यक्षम मुख्यमंत्री लाभलेले आहेत. ते तात्काळ याचा शोध घेऊन पर्दाफाश करतील. जोपर्यंत कोणी दोषी असेल असं आढळून येत नाही. तोपर्यंत राजीनामा देण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दांत हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी विरोधकांच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे.
शेंडा पार्कमधील दोन इमारतींचे पूर्ण काम पूर्ण झालेले आहे. उर्वरित दहा इमारतीचं काम मार्चपर्यंत होईल. ‘सीपीआर’चा संपूर्ण चेहरामोहरा बदललेला दिसेल, असेही मुश्रीफ यांनी सांगितले
सीपीआरमधील भ्रष्टाचाराबाबत बोलताना, भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. आयुक्तांच्या अधिकारात चौकशी समिती नेमली होती. त्याचा अहवाल आलेला आहे, संबंधित दोषींवर कारवाई होईल. जोपर्यंत मी आहे. तोपर्यंत कोणालाही अभय मिळणार नाही, असा इशारा मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.
दरम्यान, पालकमंत्रिपदाबाबत बोलताना मुश्रीफ यांनी, ‘येत्या 26 जानेवारीपर्यंत कोल्हापूरचा पालकमंत्री कोण असणार? याबाबत नक्कीच कळेल, अशी प्रतिक्रिया दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.