Santosh Deshmukh Murder : अंजली दमानियांच्या आरोपाला सत्ताधारी आमदाराचा दुजोरा; ‘त्यांच्याबाबत हे होऊ शकतं...’

Prakash Solunkhe Statement : संतोष देशमुख खून प्रकरणातील तीन फरारी आरोपीचा मर्डर झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे प्रकरण फार पेटलेले आहे.
Santosh Deshmukh-AnjaliDamania-Prakash Solunkhe
Santosh Deshmukh-AnjaliDamania-Prakash SolunkheSarkarnama
Published on
Updated on

Beed, 28 December : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणी दरररोज नवनवे खुलासे होत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर वाल्मिक कराड याच्या महागड्या गाड्या, पिस्तूल यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच, खून प्रकरणातील तीन फरारी आरोपी यांचा मर्डर झाला आहे, असा खळबळजनक आरोप केला आहे. त्याला सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळुंखे यांनी दुजोरा दिला आहे.

अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी फरारी तीन आरोपींचा मर्डर झाल्याचा खबळजनक आरोप बीडमध्ये माध्यमांशी बोलताना केला. त्यासाठी त्यांनी त्यांना आलेल्या व्हाईस मेसेजचा दाखला दिला आहे. त्यासंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंखे म्हणाले, संतोष देशमुख खून प्रकरणातील तीन फरारी आरोपीचा मर्डर झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे प्रकरण फार पेटलेले आहे. जे आरोपी आहेत, त्यांच्याबाबत हे होऊ शकतं, हे नाकारता येत नाही.

बीड जिल्ह्यातील गुंडगिरी, खूनापर्यंत प्रकरण गेलेले आहे. संतोष देशमुख यांचा खून ज्या निर्घृणपणे करण्यात आलेला आहे, त्यामुळे ज्याला मन आहे, माणुसकी आहे, असा प्रत्येक जण एकत्र येणारच ना. यात कोणतेही राजकारण नाही. बीडमधील शांतता मोर्चा कोणत्याही जातीच्या विरोधात नाही. गुन्हेगारीच्या विरोधात आहे, त्यामुळे सगळे एकत्र आले तर त्यात काय वावगं आहे, असा सवालही आमदार प्रकाश सोळुंखे (Prakash Solunkhe ) यांनी उपस्थित केला.

Santosh Deshmukh-AnjaliDamania-Prakash Solunkhe
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख खून प्रकरणी अंजली दमानियांचा खळबळजनक आरोप; ‘फरारी तीन आरोपींचा मर्डर..?’ (Video)

अंजली दमानिया यांनी काय म्हटले आहे?

एका अनोळखी नंबरवरून शुक्रवारी (ता. 28 डिसेंबर) रात्री सव्वा अकरा ते साडेअकराच्या सुमारास मला दोन फोन आले होते. त्यांनी मला व्हॉटस ॲप कॉलवर या, असे आवाहन केले होते. मात्र, अनोळखी नंबरसाठी माझे ‘व्हॉट्‌स ॲप’ कॉल सायलेन्स असल्याने मी त्यांना तुमच्याकडील माहिती मला टेक्स्ट मेसेज करा, अशी विनंती केली. त्यांनी मला दोन व्हाईस मेसेज पाठवले होते. मी ते पाहताच त्यांनी ते डिलिट केले.

Santosh Deshmukh-AnjaliDamania-Prakash Solunkhe
Santosh Deshmukh Murder : बीडमध्ये जे काही घडलंय, त्याला धनंजय मुंडेंची कार्यपद्धती जबाबदार; स्वपक्षातील नेत्याने साधला निशाणा

त्या व्हाईस मेसेजमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की, संतोष देशमुख खून प्रकरणातील फरारी तीन आरोपी मिळणार नाहीत, कारण त्यांचा मर्डर झाला आहे. त्यांचे मृतदेह कर्नाटक हद्दीत मिळाले असल्याचे म्हटले आहे. त्याबाबत मला खात्रीशीर माहिती नाही. ही माहिती मी बीडच्या पोलिस अधीक्षकांना शुकवारी रात्रीच दिली आहे. यासंदर्भात बीडच्या पोलिस अधीक्षकांनी मला सांगितले आहे की, त्याचे कन्फर्मेशन झालेले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com