Ramraje Naik Nimbalkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Phaltan : शरद पवारांच्या सहकार्यामुळेच नीरा देवघर प्रकल्प पूर्णत्वाला : रामराजे

Shetkari Melava गोखळी (ता.फलटण) येथील ग्रामपंचायत कार्यालय व पाण्याच्या टाकीचे उदघाटन आणि पूर्व भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा शेतकरी मेळावा या संयुक्त कार्यक्रमप्रसंगी रामराजेनिंबाळकर बोलत होते.

Umesh Bambare-Patil

Ramraje NaiK Nimbalkar News : नीरा-देवघरसाठी ३९०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद झाल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर Ranjitsinh Naik Nimbalkar सांगत आहेत. प्रत्यक्षात ती सुधारीत प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. मुळात हा प्रकल्प शरद पवार यांच्या सहकार्यामुळे पूर्णत्वाला जात आहे, असे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

गोखळी (ता.फलटण) येथील ग्रामपंचायत कार्यालय व पाण्याच्या टाकीचे उदघाटन आणि पूर्व भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळाव्यात रामराजे बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार दीपक चव्हाण होते. या वेळी संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर, श्रीराम कारखान्याचे अध्यक्ष डॉ.बाळासाहेब शेंडे, संचालक स्वामीनाथ साबळे, संतोष खटके, उषाताई गावडे, संजय कापसे, सरपंच सुमनताई गावडे उपस्थित होते.

रामराजे म्हणाले, शेती ही सरकारने कंट्रोल केलेला व्यवसाय असला तरी ऊसाचे ज्या पद्धतीने अंतिम उत्पादन घेण्यासाठी प्रोसेस केली. त्याचपध्दतीने आगामी काळात कापसाचे नियोजन करून कापसाची प्रक्रिया करणारी इंडस्ट्रीज निर्माण करण्यात येईल. त्याचबरोबर बरडचा नवीन साखर कारखाना सुरू करण्यासाठीही प्रयत्नशील आहे.

शरद पवार यांनी नीरा-देवघरचे धरण आणि कालवे पूर्ण होऊ दिले नाहीत. कारण त्यांना बारामतीला पाणी न्यायचे होते, अशी टीका विरोधक करत आहेत. त्यांना असे करायचे असते तर त्यांनी साडेअकरा टीएमसीचे धरणच होऊ दिले नसते. खरे तर त्यांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वाला जात आहे. गेली ३० वर्षे आपण विकासाची पावले टाकली असून, यापुढे गावोगावी भविष्याचा वेध घेणारी सुसंस्कृत पिढी निर्माण करून ते गावाचा विकास साधतील आणि मग खऱ्या अर्थाने माझ्या कष्टाचे सार्थक होईल.

संजीवराजे म्हणाले,एके काळी फलटण,बारामती कापासासाठी राज्यात प्रसिध्द होते. रोगराईमुळे कापूस हद्दपार झाला.मात्र, तालुक्यात कापसाचे पुन्हा पुनर्जीवन होत आहे, ही आनंदाची बाब आहे. ऊसाचे राजकारण या परिसराभोवती फिरले हे विसरून चालणार नाही. श्रीराम कारखाना अवसायनात काढावा लागेल अशी स्थिती असताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी मोठ्या जिद्दीने तो सुरु ठेवला आणि शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT