Dhangar Community Morcha  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maan News : उपोषण सोडण्यासाठी पालकमंत्री नको मुख्यमंत्र्यांनीच यावे : धनगर समाज आक्रमक

Dhangar Community धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस होता.

Umesh Bambare-Patil

-रूपेश कदम

Maan Dhangar Andolan News : आंदोलनकर्त्यांना भेटून त्यांचे उपोषण सोडण्यासाठी पालकमंत्री नको मुख्यमंत्रीच आले पाहिजेत, अशी मागणी सकल धनगर समाजाच्या मोर्चात करण्यात आली. या आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या समितीचा पाठपुरावा करून त्याची माहिती वेळोवेळी सकल धनगर समाज माण-खटाव समितीला दिली जाईल, असे लेखी पत्र पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून मिळत नाही, तोपर्यंत बेमुदत उपोषण सोडणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

दहिवडी तहसील कार्यालयासमोर Maan Taluka धनगर समाजाला Dhangar andolan अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस होता. या उपोषणकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी येथील सिद्धनाथ मंदिरापासून उपोषण स्थळापर्यंत ढोल-ताशाच्या गजरात, घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात धनगर बांधव व भगिनी, मेंढरासह सहभागी झाले होते.

उपोषणकर्ते म्हणाले, आपल्या माय माऊलीला, आपल्या मेंढपाळ बांधवांना न्याय देण्यासाठी आम्ही आमचे बलिदान देण्यास तयार आहोत. मुख्यमंत्री, पालकमंत्री या दोघांना आपल्याच सातारा जिल्ह्यात सातारापासून फक्त सत्तर किलोमीटरवर उपोषणास बसलेल्या धनगर बांधवांच्या वेदना समजत नाहीत का.

धनगर समाजासाठी तयार करण्यात आलेले महामंडळ म्हणजे तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. याला निधी नाही की, याच्यावर कोणाची नेमणूक नाही. काळ्या रानात फिरणाऱ्या मेंढपाळांच्या जिवाची यांना किंमत नाही. मेंढ्यांना चारायला कुरण नसेल तर मेंढपाळांनी जगायचं कसं.

धनगर समाजाच्या घरकुलांसाठी सरकारकडे निधी नाही. नक्की सरकारचं चाललंय काय, त्यामुळे ठोस निर्णय झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असा निर्धार केला. या वेळी सिद्धी हिरवे या विद्यार्थिनीने समाजाच्या वतीने बोलताना आजपर्यंत सर्वच राजकर्त्यांनी धनगर समाजावर अन्याय केला असून, आपण सत्ता हाती घेतल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत, असे प्रतिपादन केले.

Edited By Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT