Shahaji Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शहाजी पाटलांचा २४ तासांत 'यू टर्न' : शिवसेना, उद्धव ठाकरेंमुळेच आमदार झालो!

सरकारबद्दल कोणतीही नाराजी नाही : शिवसेना आमदार शहाजी पाटील यांचे स्पष्टीकरण

भारत नागणे

पंढरपूर : मी मरेपर्यंत उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचा शिवसैनिक म्हणूनच काम करणार आहे, त्यांच्यामुळेच मी आमदार झालो आहे. महाविकास आघाडी सरकार काळात सांगोला विधानसभा मतदार संघात 240 कोटी रुपयांची विकासकामे मंजूर केली आहेत, असे स्पष्टीकरण सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांनी आज (ता. १० जानेवारी) येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिले. (Not upset on the government : Shiv Sena MLA Shahaji Patil's explanation)

आमदार शहाजी पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी पंढरपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्हाला कोणी विचारत नाही. शिवसेनेचे केवळ 1100 मतदार होते. परंतु भाजपमुळे आमदार झालो, असे त्यांनी म्हटले होते. मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे राज्याच्या राजकारणात पडसाद उमटले. त्या नंतर आमदार पाटील यांनी आज सारवासारव करत केवळ शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहकार्यामुळेच आपण आमदार झाल्याचे स्पष्ट केले.

आमदार पाटील म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची अंत्ययात्रा पाहून मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस नेत्यांशी कसलाही वाद नसताना मी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत 2012 मध्ये प्रवेश केला. केवळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेमुळेच आपण आमदार झालो आहोत. घर की मुर्गी दाल बराबर हे वक्तव्य आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांच्याबद्दल बोललो होतो. निदान त्यांना तरी संधी मिळायला हवी होती. ते 30 वर्ष आमदार आहेत, असे मला म्हणायचे होते.

शिवसेनेला 2009 मध्ये 1100 मते होती. पण, उद्धव ठाकरे यांची सभा झाली आणि 2014 मध्ये 75 हजार मते शिवसेना उमेदवार म्हणून मला मिळाली. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत मी शिवसेनेमुळेच पुन्हा आमदार झालो. त्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होती. त्यावेळी भाजप उमेदवारास शिवसेनेने मदत केली, तर भाजपने शिवसेनेला मदत केली आहे. त्यामुळे ओघात मी बोलून गेलो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या मतदारसंघात 240 कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत. माझी सरकारवर कोणतीही नाराजी नसल्याचे या वेळी आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, धनंजय काळे, सूर्यकांत घाडगे, कमरूद्दुन खतीब आदी‌ उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT