शिवसेनेची ११०० मते तरीही मी आमदार झालो : शहाजी पाटलांनी सांगितले विजयाचे गणित

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात माढा लोकसभा मतदारसंघातील एकाही आमदाराला संधी मिळालेली नाही.
Shahaji Bapu Patil
Shahaji Bapu Patilsarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : शिवसेनेला राज्यात मुख्यमंत्रीपद मिळाले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हे पक्ष सत्तेत आले. मात्र, स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीत गुंता झाल्याचे दिसून येत आहे. स्थानिक पातळीवर भाजप-शिवसेना (ShivSena) नेते एकत्र असल्याने त्यांची गोची झाल्याचे दिसत आहे. सांगोल्यातील शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांच्या विधानामुळे पुन्हा स्थानिक वाद समोर आला आहे.

पंढरपूर येथील एका खासगी हाॅस्पिटलच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात आमदार पाटील बोलत होते. तालुक्यात शिवसेनेची फक्त ११०० मते असताना मी आमदार झालो, कारण माझ्या विजयात भाजपची मोलाची साथ लाभल्याचे पाटील म्हणाले. तसेच, खासदार रणजित निंबाळकर यांच्यामुळे पुन्हा आपल्याला आमदारकी मिळाली. या निवडणुकीत भाजपच्या नेत्यांचे माझ्यावर 24 तास लक्ष होते. सारखे काही अडचण आहे का विचारायला फोन येत असत असे शहाजीबापू यांनी सांगितले.

Shahaji Bapu Patil
‘आमचं नवीन ठरलंय’ : संजय मंडलिकांच्या घोषणेने सतेज पाटलांना इशारा

सांगोल्यात 18 वर्षानंतर पुन्हा आमदारकी मिळताना भाजपच्या साथीसोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाचाही छुपा पाठिंबा मिळाल्याचे गुपित पाटील यांनी पंढरपूर येथील एका कार्यक्रमात उघड केले. सांगोला हा दिवंगत शेकाप नेते गणपतराव देशमुख यांचा मतदारसंघ होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत ते स्वत: उमेदवार नव्हते. त्यांनी दिलेल्या उमेदवाराच पराभव करत शहाजी पाटील यांनी शिवसेनेच्या तिकीटावर विजय मिळवला.

याच कार्यक्रमात बोलताना त्यांनी राज्यातील आपल्याच सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात माढा लोकसभा मतदारसंघातील एकाही आमदाराला संधी मिळालेली नाही. आम्हाला कोणालाही त्यांनी घेतलेले नाही. माझे सोडा शिवसेनेतून मी पहिल्यांदा निवडून आलो आहे. मला अगोदरच सांगण्यात आले होते, गडबड करायची नाही, लांब बसायचे, त्यानुसार आम्ही आपले लांब बसलो. पण, बबनदादा शिंदे यांच्यासाखे ३०-३० वर्षे निवडून आलेल्या आमदारांनाही संधी मिळालेली नाही. त्यामुळे आम्हाला वाटते नाही की या सरकारमध्ये आमची कोणी दखल घेतील म्हणून...आमचा कोणी विचारही करायला तयार नाहीत. गप्प बसा...जावा गावाकडे, असं आम्हाला सांगितले जाते, असं सांगत आमदार पाटील यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली.

Shahaji Bapu Patil
शिवसेना आमदार भाजप खासदाराला म्हणाले, ‘मंत्रिपदासाठी तुमची मोदी-शहांकडे शिफारस करतो’

यापूर्वीही आमदार पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर ते चांगलेच अडचणीत आले होते. मध्यंतरी एका साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या कार्यक्रमात साखर कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांना पैसे वाटप करुन निवडणूक जिंकली, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावेळी त्यांच्या या वक्तव्याविषयी सर्वच स्तरातून टीका झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आमदार पाटील यांनी राज्य सरकारमध्ये आपणाला कोणी विचारत नाही, असे सांगत मनातील खदखद बाहेर काढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com