Nagar Politics :  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bhausaheb Wakchoure News : रेल्वे लाइनलगतच्या लोकांना नोटिसा; भाऊसाहेब वाकचौरेंनी दंड थोपटले.. !

Nagar Politics : श्रीरामपूर मध्ये रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे लाइनलगत राहणाऱ्या अनेक लोकांना अतिक्रमण संदर्भात नोटिसा देण्यात आल्या आहेत.

राजेंद्र त्रिमुखे

Nagar Politics : श्रीरामपूर शहरातून जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या रेल्वे लाइनलगत असलेल्या जागेतील अतिक्रमणधारकांना रेल्वे विभागाकडून जागा खाली करण्याबाबत कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती कळताच माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा करत मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिर्डी लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार असलेले भाऊसाहेब वाकचौरे आता चांगलेच अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत.

श्रीरामपूर मध्ये रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे लाइनलगत राहणाऱ्या अनेक लोकांना अतिक्रमण संदर्भात नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. साधारण 960 लोकांना या नोटिसा पाठवण्यात आल्याची माहिती मा. खा. भाऊसाहेब वाकचौरे यांना समजल्यानंतर त्यांनी येथील रहिवाशांची भेट घेतली. शिवसेनेचे स्थानिक नेते सचिन बडदे, कामगार नेते नागेश भाई सावंत, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राहुल मुथा आदी या वेळी त्यांच्यासोबत होते.

वाकचौरे यांनी त्या भागातील लोकांना भेट देऊन सर्वांची माहिती घेतली व कोणत्याही परिस्थितीत आपण घाबरून जाऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे आश्वासन दिले. तसेच नगर, सोलापूर आणि दिल्लीच्या संबंधित रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली. हा प्रश्न सामोपचाराने मिटवला जावा, असे वाकचौरे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. दिल्ली आणि सोलापूरच्या अधिकाऱ्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आहे.

कोणत्याही परिस्थितीत सर्व लोकांना त्रास होऊ देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. मा.खा. वाकचौरे सध्या शिर्डी लोकसभेसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडून उमेदवारीसाठी आग्रही आहेत. याच जागेवर माजी मंत्री बबनराव घोलप यांनीही उद्धव ठाकरेंकडे दावा केला असून, त्यासाठी मुंबईत कार्यकर्त्यांचे मोठे शक्तिप्रदर्शनही केले होते.

अजून तरी शिर्डीची अधिकृत उमेदवारी उद्धव ठाकरे गटाने घोषित केलेली नसली तरी बबनराव घोलप एकीकडे उमेदवारीसाठी आग्रही असताना दुसरीकडे भाऊसाहेब वाकचौरे मात्र सध्या शिर्डी मतदारसंघात चांगलेच अॅक्टिव्ह झाल्याचे दिसून येत आहेत. मतदारसंघातील रोज विविध गावांना भेटी देत तेथील नागरिकांचे प्रश्न समजून घेणे, गणेश उत्सवात अनेक सार्वजनिक गणेश मंडळांत आरतीच्या निमित्ताने उपस्थिती, शहरी नागरी प्रश्नांत लक्ष घालून कार्यवाहीसाठी प्रयत्न करताना वाकचौरे दिसत आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT