Praniti Shinde  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Praniti Shinde : आता भाजपचा त्रास सहन करायचा नाही; आता त्रास देण्याची वेळ : प्रणिती शिंदेंचे विधान

South Solapur Program : मागील 10 वर्षांत तुम्हाला जो त्रास झाला आहे, तो पुसून काढायचा आहे,

Vijaykumar Dudhale

solapur, 20 June : भाजपमुळे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे प्रमुख मार्गदर्शक तथा ज्येष्ठ संचालक धर्मराज कडादी आणि त्यांच्या काखान्याच्या शेतकरी सभासदांना त्रास सहन करावा लागला. मात्र आता काँग्रेसचा खासदार निवडून आला आहे, त्यामुळे आता त्रास सहन करायची नाही, तर त्रास देण्याची वेळ आली, असे विधान सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी केले आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका कार्यक्रमात खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी हे विधान केलं आहे. त्या वेळी व्यासपीठावर सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी (Dharmraj Kadadi) उपस्थित होते. सोलापूर लोकसभा मतदासंघातून निवडून आल्यापासून प्रणिती शिंंदे ह्या एकामागून एक अशी मोठमोठी विधाने करीत आहेत. त्यात आज एका विधानाची भर पडली आहे.

खासदार प्रणिती शिंदे यांनी त्या कार्यक्रमात भाजपवर हल्लाबोल केला, त्या म्हणाल्या, सिद्धेश्वर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आणि कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना भाजपच्या लोकामुळे त्रास सहना करावा लागला आहे. हे सांगताना सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्याचे प्रणिती शिंदे यांना आधोरेखित करायचे होते.

आता सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा खासदार निवडून आला आहे. आता त्रास सहन करायची नाही, तर त्रास देण्याची वेळ आली आहे, त्यामुळे मागील 10 वर्षांत तुम्हाला जो त्रास झाला आहे, तो पुसून काढायचा आहे, असं सांगून खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर टीका केली.

मागील 10 वर्ष सोलापुरात भाजपचे ऍड. शरद बनसोडे आणि डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे खासदार होते. दरम्यान, मागील वर्षी विमानाच्या टेक ऑफला अडथळा ठरत असलेली सिद्धश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यात आली आहे. त्यामागे भाजपचे आमदार असल्याचा उघड आरोप धर्मराज काडादी यांच्याकडून करण्यात येत होता. ज्या वेळी सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडण्यात आली, त्या वेळी सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT