Solapur Politics : ॲक्टिव्ह कोठे अन्‌ अस्वस्थ काडादी सोलापूर भाजपच्या गडाला लावणार सुरुंग

माजी महापौर कोठे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून सोलापुरात आयटी पार्क व रोबोट निर्मितीचा प्रकल्प आणला आहे.
Sharad Pawar-Mahesh kothe-Dharmraj Kadadi
Sharad Pawar-Mahesh kothe-Dharmraj KadadiSarkarnama

Solapur News: सोलापूर शहर व परिसराच्या राजकारणावर निर्णायक परिणाम करणारे दोन फॅक्टर म्हणून माजी महापौर महेश कोठे आणि सिध्देश्‍वर कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी यांच्याकडे पाहिले जाते. हे दोन नेते प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ज्यांच्यासोबत असतात, त्यांच्या विजयाचे गणित पूर्ण होते. पक्ष अन्‌ विधानसभा मतदार संघ या बद्दल २००९ पासून अस्थिर असलेले कोठे आता स्थिर होऊन ॲक्टिव्ह झाले आहेत. आजपर्यंत थेट राजकीय आखाड्यात उडी न घेतलेले काडादी आता ‘हीच ती योग्य वेळ’ या निर्णयापर्यंत आल्याचे दिसते. सध्या तरी कोठे-काडादी हे दोन महत्वाचे फॅक्टर भाजपच्या विरोधात दिसत आहेत. (Active Kothe and restive Kadadi will put a tunnel in BJP's stronghold of Solapur)

बारामतीची (Baramati) लाईन क्लिअर झाल्याने महेश कोठे (Mahesh kothe) आता ॲक्टिव्ह झाले आहेत. राजकीय खेळीत नामशेष झालेल्या चिमणीचे प्रत्युत्तर अन्‌ सिध्देश्‍वरच्या सभासद, कामगारांना पर्याय द्यायचा कसा? या विचारात काडादी (Dharmraj Kadadi) अस्वस्थ आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ॲक्टिव्ह कोठे, अस्वस्थ काडादी हे सोलापूरच्या बदलत्या राजकारणाची नांदी ठरू शकतात.

Sharad Pawar-Mahesh kothe-Dharmraj Kadadi
Raj Thackeray News : राज ठाकरेंनी फोन फिरवताच‌ जिल्हा बॅंकेच्या वसुलीला तीन महिन्यांची स्थगिती मिळाली

सोलापुरातील गिरण्यांचे भोंगे बंद पडल्याच्या आठवणींचा आता कुठे विसर पडायला सुरुवात झाली होती. तोपर्यंत सिध्देश्‍वर साखर कारखान्याच्या बंद पडलेल्या भोंग्याने जुन्या आठवणी जाग्या केल्या आहेत. सोलापूर आणि परिसराच्या राजकारणावर प्रभाव पाडणारी सिध्देश्‍वर कारखान्याची चिमणी पडल्याने सभासद, कामगार अस्वस्थ आहेत. चिमणी पडली खरी परंतु विमानसेवा सुरू होईल का? याची धाकधूक कायम आहे. पडलेली चिमणी अन्‌ सुरू होणारी विमानसेवा यावरून सोलापुरात अस्वस्थतता आहे.

Sharad Pawar-Mahesh kothe-Dharmraj Kadadi
Ajit Pawar News : अजित पवार ठरविणार राष्ट्रवादीची निवडणूक रणनीती; म्हणूनच मागितले संघटनेतील पद

माजी महापौर कोठे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून सोलापुरात आयटी पार्क व रोबोट निर्मितीचा प्रकल्प आणला आहे. येत्या ९ जुलैला पवारांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन सोलापुरात होण्याची शक्यता आहे. पवार यांनी त्यांच्या संबंधातील उद्योजकाला खास सोलापुरात पाठवले आहे. या उद्योजकाला सोलापुरात चांगला प्रतिसाद मिळाल्यास भविष्यात ई-व्हेईकल निर्मिती, सेमीकंडक्टर व एच-टू बनविण्याचा प्रकल्प सोलापुरात येण्याची शक्यता आहे. आगामी २०२४ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा प्रकल्प वेळेत कार्यान्वित करण्याचे नियोजन आखल्याचे समजते.

Sharad Pawar-Mahesh kothe-Dharmraj Kadadi
Police Run Away : काय सांगता ! चक्क पोलिसावरच आली पळून जाण्याची वेळ, रात्र काढली उसात; काय आहे कारण ?

काडादी यांनी १९९५ ते १९९८ पर्यंतच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी स्वत:साठी मिळविण्याचा प्रयत्न केला, मुलाखतीही दिल्या. त्यांच्या नावाचा मात्र कधी विचार झाला नाही. त्यानंतर त्यांनी थेट राजकारणात जाण्याचे टाळत ‘सबका साथ’ ही भूमिका घेतली. स्पर्धेच्या राजकारणात आता काडादी कोणाचे? या प्रश्‍नाचे उत्तर त्यांना साथ देणाऱ्या सर्वच पक्षांनी शोधण्याचा प्रयत्न केला. यापैकी कोणालाच ठोस उत्तर मिळाले नसल्याचे दिसते.

बदलत्या राजकारणात, बदलत्या काळात काडादी यांना आता तुम्ही कोणाचे? याचे उत्तर द्यावे लागणार आहे. सिध्देश्‍वर साखर कारखान्याच्या पडलेल्या चिमणीचा धुराळा नक्की कुठे सरकणार? उत्तरकडे की दक्षिणकडे?, अक्कलकोटवर काय परिणाम होईल? या चर्चा अन्‌ तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. काडादी ज्या दिशेला बोट दाखतील, त्या दिशेला सरकलेला चिमणीचा धुराळा निर्णायक मानला जात आहे.

Sharad Pawar-Mahesh kothe-Dharmraj Kadadi
Ajit Pawar News : निलेश लंके तर 'लंका'च पेटवत चाललाय ! अजितदादांकडून कामाचे कौतुक अन् विरोधकांना चिमटा

तुम्ही चिमणी पाडली, आम्ही तुम्हाला पाडणार

कोल्हापूरच्या राजकारणातून महाराष्ट्राला ‘आमचं ठरलंय’ ही सुपरहिट स्लोगन मिळाली. ‘तुम्ही चिमणी पाडली, आम्ही तुम्हाला पाडणार’ ही स्लोगन चिमणी पडल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच सोलापूरच्या राजकारणातून जन्माला आली. सुमारे २८ हजार ५४६ सभासद असलेल्या सिध्देश्‍वर साखर कारखान्याचे सर्वाधिक १३ हजार २४ सभासद दक्षिण सोलापू्र तालुक्यात आहेत. त्या खालोखाल अक्कलकोट तालुक्यात ९ हजार १६७, उत्तर सोलापूर तालुक्यात ३ हजार ३२५, मोहोळ तालुक्यात १ हजार ५७४ व तुळजापूर तालुक्यात १ हजार २६१ सभासद आहेत.

उत्तर, दक्षिणबरोबरच अक्कलकोटमध्ये परिणाम दिसेल

दक्षिण सोलापू्र तालुक्यात सर्वाधिक सभासद असले तरीही या तालुक्यातील अडीच जिल्हा परिषद गट (बोरामणी, कुंभारी पूर्ण व वळसंग आर्धा गट) अक्कलकोट विधानसभेला जोडलेला आहे. चिमणीचा इफेक्ट जसा उत्तर व दक्षिणमध्ये दिसणार आहे. तसाच इफेक्ट अक्कलकोटमध्येही दिसण्याची दाट शक्यता आहे.

Sharad Pawar-Mahesh kothe-Dharmraj Kadadi
Congress News : या 'तेरा' मतदारसंघात काँग्रेसला विजयाची खात्री; राज्यात डबल आकड्यात जाण्यासाठी कोअर कमिटीच्या बैठकीत ठरली विशेष रणनीती!

पवारांची मोर्चेबांधणी कोणासाठी?

सिध्देश्‍वर साखर कारखान्यामध्ये काडादी यांना केलेली मदत, कोठे यांच्या माध्यमातून सोलापुरात येऊ घातलेले प्रकल्प यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका महत्वाची राहिलेली आहे. सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे घ्यावी, या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी वारंवार केलेली मागणी आणि पवार यांनी सोलापूरच्या प्रश्‍नात थेटपणे घातलेले लक्ष? यामुळे पवारांची मोर्चेबांधणी कोणासाठी आहे? याची उत्तसुकता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासाठी आमदार रोहित पवार ज्या पद्धतीने तन, मन, धनाने धावून आले होते. तसेच, ते सोलापुरातील आयटी पार्क व रोबोट निर्मितीच्या प्रकल्पासाठी तन, मन, धनाने धावून आले आहेत. त्यामुळे कोण रोहित पवार? या प्रश्‍नाचे ठोस उत्तर येत्या काळात मिळण्याची दाट शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com