Mahesh Kothe-Prathamesh Kothe -Vijaykumar Deshmukh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahesh Kothe News : भाजपचे विजयकुमार देशमुखांविरोधातील न्यायालयीन लढाई आता प्रथमेश कोठे लढणार; महेश कोठेंनी हायकोर्टात दाखल केली होती याचिका

Assembly Election Victory Issue : महेश कोठे यांनी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विजयाला आव्हान देणारी निवडणूक याचिका ॲड.असीम सरोदे व ॲड. श्रीया आवले यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 22 July : सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढविलेले माजी महापौर (स्व.) महेश कोठे यांचा भाजपचे विजयकुमार देशमुख यांच्याकडून पराभव झाला होता. त्या पराभवानंतर कोठे यांनी देशमुखांच्या विजयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. मात्र, महेश कोठे यांचा हृदयविकराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने या याचिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, कोठे यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे हे ही याचिका पुढे चालविणार असून उच्च न्यायालयाने त्यास मान्यता दिली आहे.

महेश कोठे (Mahesh Kothe) यांनी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विजयाला आव्हान देणारी निवडणूक याचिका ॲड.असीम सरोदे व ॲड. श्रीया आवले यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 112 नुसार याचिकाकर्त्याच्या मृत्यूनंतर न्यायालयात दाखल केलेली निवडणूक याचिका रद्द होते. ती सुनावणीसाठी न घेता रद्द करण्यात येते.

लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 112 मधील एका तरतुदीनुसार ‘मृत याचिकाकर्त्याच्या जागी पिटिशनर म्हणून माझे नाव घ्यावे. मला याचिका चालवायची आहे, अशी विनंती न्यायालयास (Court) याचिका दाखल करण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्तीने केली तर न्यायालयास नवीन व्यक्तीचे नाव याचिकाकर्ता म्हणून घेण्याचा अधिकार आहेत.

निवडणुकीत चुकीच्या पद्धतीने विजय मिळविणाऱ्या प्रवृतींविरुद्ध न्यायालयीन लढाई लढावी, अशी महेश कोठे यांची इच्छा होती, त्यामुळे (स्व.) कोठेंचे चिरंजीव प्रथमेश यांनी हस्तक्षेप अर्ज करून निवडणूक याचिकेत वडिलांच्या ऐवजी पिटिशनर म्हणून त्यांचे नाव समाविष्ट करण्यात यावे, अशी विनंती प्रथमेश कोठे (Prathamesh Kothe) यांनी न्यायालयात केली होती.

त्या प्रकरणाची सुनावणी घेण्यात यावी, असा विनंती अर्ज ॲड. असीम सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली केला होता. त्याला उच्च न्यायालयाने मान्यता दिली असून आता प्रथमेश महेश कोठे विरुद्ध विजयकुमार देशमुख अशी निवडणूक याचिका सुनावणीसाठी घेण्यात येणार आहे.

दरम्यान, मूळ याचिकाकर्ते महेश कोठे यांचे निधन झाल्याचे येत्या 14 दिवसांत ऑफिशिअल गॅझेटमध्ये प्रसिद्ध करावे. त्यानंतर महेश कोठे यांच्या ऐवजी पिटिशनर म्हणून नाव लावून घेण्यासाठी त्यांचे पुत्र प्रथमेश कोठे यांनी रीतसर स्वतंत्र अर्ज करावा, अशी सूचना न्यायमूर्ती अभय आहुजा यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT