Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी 'ग्रेडसेपरेटर' सातारकरांच्या माथी मारला... शिवेंद्रसिंहराजे

Umesh Bambare-Patil

सातारा : बोटावर मोजण्याइतके लोक साताऱ्यातील ग्रेडसेपरेटरमधून जातात. मी काय तरी करतोय, तेच योग्य आहे, या त्यांच्या लहरीपणातून हे काम झाले आहे. त्यातूनच हा ग्रेडसेपरेटर साताकरांच्या माथी मारला आहे. संकल्पक म्हणून नाव लावून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा हा प्रकार आहे. या प्रकल्पामुळे सातारकरांचा पैसा वाया गेला आहे, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजेंचा नामोल्लेख टाळून केली आहे.

सातारा शहरातील बालगोपाल मित्र मंडळाने पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन ग्रेडसेपरेटर हॉरर शोसाठी भाड्याने मिळावा, अशी मागणी केली होती. या मुद्द्यावर आज आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी खासदार उदयनराजेंवर टीका केली आहे.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ग्रेडसेपरेटरबाबत आजपर्यंत सातारकर बोलत नव्हते. मात्र, या मंडळाने या माध्यमातून हा प्रश्न समाजापुढे आणला आहे. मुळात ग्रेडसेपरेटर सातारकरांच्या माथी मारला आहे. त्यांच्या लहरीपणाचे हे काम असून मी काय तरी करतोय, तेच योग्य आहे. यातूनच हा ग्रेडसेपरेटर झाला आहे. मुळात शाहू चौकातून हा रस्ता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणे गरजेचे होते.

कारण सगळ्यांची कामे न्यायालय, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयात असतात. पण हा रस्ता बसस्थानकाकडे जातो. त्यामुळे त्यांचा काहीही उपयोग होत नाही. अगदी बोटावर मोजण्याइतके लोक दररोज ग्रेड सेपरेटरमधून जातात. केवळ संकल्पक म्हणून फलक लावायचे आणि स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा हा प्रकार आहे.

इतके मोठे काम असून त्यातून मोठ्याप्रमाणात पैसा वाया गेला आहे. सातारकरांसाठी त्याचा काहीही उपयोग होत नाही. केवळ या उपहासातून त्या मंडळाने ही मागणी केली असावी. त्यातून हे लोकांपुढे आणले गेले. त्यामुळे त्या मंडळाला सलामच केला पाहिजे. या प्रकल्पावर वायफळ खर्च झालाय तो या अर्जातून लोकांपुढे आणला गेला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता या ग्रेडसेपरेटरच्या रचनेत बदल करता येऊ शकतो का त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने अभ्यास करून निर्णय घेतला पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT