सातारा राष्ट्रवादीतील अनेक नेते आमच्या संपर्कात : शिंदे सरकारमधील मंत्र्याचा गौप्यस्फोट

आगामी २०२४ च्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यात अजित पवारांना वेगळे चित्र पहायला मिळेल, तेव्हा त्यांना धक्का बसेल, ही सूचक विधानही त्यांनी केले.
 Ajit Pawar-Shambhuraj Desai
Ajit Pawar-Shambhuraj DesaiSarkarnama
Published on
Updated on

सातारा : सातारा (Satara) जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अनेक नेते-पदाधिकारी आमच्या संपर्कात आहेत. साताऱ्यात आल्यानंतर आमच्यावर गद्दार म्हणून टीका करायची, तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार लवकरच पडणार आहे, असे सांगून ते राष्ट्रवादीच्या लोकांना थांबविण्याचे काम विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) करत आहेत. पण, आगामी २०२४ च्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यात दूध का दूध आणि पानी का पानी होईल, असा दावा कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केला आहे. (Leaders of Satara NCP contact us : Shambhuraj Desai)

विरोधी पक्षनेते पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना शंभूराज देसाई यांनी वरील दावा केला आहे. ते म्हणाले की सातारा जिल्हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य गड होता. जिल्ह्यातील आठपैकी सात मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असायचे. पण, सद्यस्थितीत राष्ट्रवादीची ताकद घटून त्यांच्या आमदारांची संख्या चारवर आली आहे. जिल्ह्यात सध्या शिवसेना-भाजपचे चार आमदार आहेत. आगामी २०२४ च्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यात अजित पवारांना वेगळे चित्र पहायला मिळेल, तेव्हा त्यांना धक्का बसेल, ही सूचक विधानही त्यांनी केले.

 Ajit Pawar-Shambhuraj Desai
केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल : पश्चिम महाराष्ट्रातील एका नेत्याचा समावेश होणार; शिंदे गटालाही संधी

सत्तेतून बाहेर जावे लागत असल्यामुळे अजित पवार सध्या आमच्यावर टीका करत आहे. मी त्यांच्यासोबत महाविकास आघाडी सरकारमध्ये एकत्र काम केले आहे. ते उपमुख्यमंत्री असताना मी त्यांच्या दोन खात्यांचा राज्यमंत्री होतो. दादांचं काम अगदी जवळून पाहिलं आहे. त्यामुळे अजित पवारांनी आम्हाला गद्दार म्हणताना एक विचार करावा की, हा शिवसेना पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत, आम्ही कोठेही शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही, असेही शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

 Ajit Pawar-Shambhuraj Desai
खडसे-शहांच्या भेटीच्या चर्चेत नवा ट्विस्ट; आता पवारांच्या उपस्थितीत खडसे शहांना भेटणार!

सध्या शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात दररोज कलगीतुरा रंगलेला असतो. दोन्ही बाजूंनी अगदी शेलक्या शब्दांत एकमेकांवर टीका करण्यात येते. विरोधी पक्षनेते अजित पवारही गद्दार म्हणून शिंदे गटावर टीका करत आहेत, त्यामुळे दुखावलेल्या देसाई यांनी पवारांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. साताऱ्यात राष्ट्रवादीला आव्हान देण्याचा विचार बोलून दाखवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com