Sushilkumar Shinde-Balasaheb Thorat
Sushilkumar Shinde-Balasaheb Thorat Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

थोरातांच्या राजीनाम्यावर शिंदे म्हणतात ‘काळजी करण्याचे कारण नाही...’

विश्वभूषण लिमये

सोलापूर : ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेसमधील (Congress) वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासोबतच्या मतभेदामुळेच थोरात यांनी राजीनामा दिल्याची चर्चा माध्यमांत रंगली आहे. तथापि काँग्रेसचे नेतेमंडळीही या वादावर बोलण्यास तयार नाहीत. मात्र, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी थोरात-पटोले वादावर भाष्य केले आहे. काळजी करण्याची काही एक कारण नाही, सगळं काही ठीक होईल’, असे त्यांनी या वादावर म्हटले आहे. (On Balasaheb Thorat's resignation, Shinde says 'no reason to worry...')

सुशीलकुमार शिंदे हे आज सोलापुरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांनी विधी मंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे की नुसते पत्र आहे, हे अजून मला माहिती नाही. त्यांच्याशी (पटोले आणि थोरात) कोणाशीही बोलणं झालेलं नाहीये. मी सोमवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत पुण्यात होतो, त्यांनाही हे माहिती नाही आहे. असे सांगून काँग्रेस ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी थोरातांच्या राजीनाम्यावर बोलणं टाळलं.

दरम्यान, नाना पटोले आणि बाळासोब थोरात यांच्या वादासंदर्भात ते म्हणाले की, असले हे सर्व वाद टेम्पररी असतात. आता सगळं ठीक होईल. काळजी करण्याचं कारण नाही, असं म्हणतं पक्षातील अंतर्गत धुसफुशीवर जादा बोलणं टाळले.

सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढून जिंकली. त्यानंतर पटोले आणि तांबे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. तांबे यांच्या आडून पटोले यांनी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधल्याचे मानले जात होते. त्यातच खुद्द थोरात यांनीही काँग्रेच्या विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. तो पटोले यांच्याशी असलेल्या मतभेदातून दिल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT